माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार   

बारामती, (प्रतिनिधी) : जोपर्यंत माझे हातपाय हालतात, तोपर्यंत सगळ्यांचे भले करणार, जेव्हा मला वाटेल मला कोणीतरी उजवी आहे. तेव्हा मी आपोआप बाजूला जाईल, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या तर कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा, मीच कारखान्याचा अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट केले.
 
 माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.पवार पुढे म्हणाले, मी राजकारण तिथेच करतो, जिथे आवश्यक आहे. प्रपंचाच्या ठिकाणी राजकारण आणणार नाही. कारखाना सुरू असेल तर रस, चहा मिळेल; पण गाड्या, हॉटेलचे बिले मिळणार नाहीत, असे देखील स्पष्ट शब्दात सांगितले. मी २० जणांचे राजीनामे घेतले आहेत. कोणी वेडेवाकडे काम केले, तर त्याचा राजीनामा मंजूर केला जाईल. विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले, ज्यांना दोन जण उठवायला लागतात त्यांना संचालक व्हायचे आहे, अरे थांबणार कधी? मी कामाचा माणूस आहे. मी अर्ज भरला म्हणून तुमच्या पोटात दुखते का? 
 
खाजगी कारखाना सुरू केल्यावरून होणार्‍या टीकेवर उत्तर देताना पवार म्हणाले, माझा खाजगी कारखाना सुरू करण्याचा हेतू नव्हता. सरकारच्या अटीमुळे सहकारी कारखाना उभा केला. आता टीका करताहेत की हा सहकार मोडतोय. पण येत्या पाच वर्षांत मी सभासदांना चांगला भाव नाही दिला, तर अजित पवार नावाचा नाही. एखाद्याला मी निवडून नाही द्यायचड म्हणलो तर काय करतो, हे पुरंदरने पाहिले आहे. आणि सारा महाराष्ट्र जाणतो, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना इशाराही पवारांनी दिला.

Related Articles