E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात २ दिवसात २४ फलंदाज बाद
Samruddhi Dhayagude
28 Jun 2025
केन्सिंग्टन ओव्हल : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना तिसर्या दिवशीच निकाली लागण्याचे संकेत दिसत आहेत. बार्बाडोसमधील ब्रिजटाउनच्या केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्या दोन दिवसांच्या खेळात फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. एक अर्धशतक सोडले तर अन्य कोणत्याही फलंदाला मैदानात तग धरता आला नाही. दोन दिवसांत २४ बळी पडल्याचे पाहायला मिळाले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या हंगामात दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा फायनल सामना गमावल्यावर वेस्ट इंडिज दौर्यातील कसोटी मालिकेसह ऑस्ट्रेलिया संघाने आगामी चक्राची सुरुवात केली आहे. बार्बाडोसमधील ब्रिजटाउनच्या केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना यजमान वेस्ट इंडिजच्या संघाने पाहुण्या कांगारुंना अवघ्या १८० धावांत आटोपले. टॅविस हेडच्या ५९ धावा वगळता दोन्ही संघातील अन्य एकाही खेळाडूला अर्धशतकापर्यंत मजल मारता आली नाही.
ऑस्ट्रेलियन संघाला १८० धावांवर रोखल्यावर वेस्ट इंडिजच्या संघाने कर्णधार रोस्टन चेज ४४ (१०८) आणि विकेट किपर बॅटर शाइ होप ४८ (८१) यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर पहिल्या डावात १९० धावा करत कॅरेबियन संघाने १० धावांची का होऊन पण आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात ९२ धावांवर ४ विकेट्स गमावल्या. यासह दोन दिवसांच्या खेळात यजमान वेस्ट इंडिजच्या १० आणि पाहुण्या संघाने गमावलेल्या १४ अशा या सामन्यात एकूण २४ विकेट्स पडल्या आहेत.
हा सामना निकाली लागणार हे जवळपास स्पष्ट झालं असून कोण कुणाचा खेळ खल्लास करणार ते पाहण्याजोगे असेल.ऑस्ट्रेलियन संघाकडून पह्यिा डावात मेचेल स्टार्कनं सर्वाधिक ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय हेजलवूड, पॅट कमिन्स आणि वेबस्टर यांनाा प्रत्येकी २-२ आणि लायनला एक विकेट मिळाली. कॅरिबियन संघाकडून जेडन सील्स याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. शामर जोसेफनं आपल्या खात्यात ४ विकेट्स जमा केल्या तर जस्टिन ग्रेव्सला एक विकेट मिळाली. दुसर्या डावातही या गोलंदाजांनी प्रत्येकी १- १ विकेट जमा केली असून अल्झारी जोसेफनंही आपल्या खात्यात एक विकेट जमा केली आहे.
Related
Articles
तिबेटमध्ये चीनकडून ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्यास सुरुवात
21 Jul 2025
’महापूर’ नाट्यप्रयोगाला रसिकांचा प्रतिसाद
22 Jul 2025
भुवनेश्वरमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात आग
19 Jul 2025
राहुल यांच्या विधानावर मार्क्सवादी नेत्याची टीका
20 Jul 2025
फर्ग्युसन रस्त्यावरची बेकायदा विक्री रोखा
23 Jul 2025
निगडीत व्यावसायिकाच्या घरी सशस्त्र दरोडा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना