२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव   

मुंबई : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाला. मात्र, ‘११ ए’ या सीटवर बसलेले ब्रिटीश नागरिक रमेश विश्वासकुमार हे एकमेव व्यक्ती या दुर्घटनेतून बचावले. २७ वर्षापूर्वीही अशाच एका विमान अपघातात थाई गायकाचा ‘११ ए’ सीटमुळे जीव वाचला होता.थायलंडमधील प्रसिद्ध गायक रुआंगसाक लोयचुसाक यांनी आपल्या आयुष्यातील एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. या घटनेचाही ११ ए॒ सीट नंबरशी संबंध आहे. लोयचुसाक यांनी यासंदर्भात केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, जेव्हा मी एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेबद्दल ऐकले तेव्हा एक अजब संयोग जाणवून आला. ११ डिसेंबर १९९८ साली मी २० वर्षाचा होतो, तेव्हा टीजी २६१ या थाई एअरवेजचा अपघात घडला. हे विमान बँकॉकहून सुरत थानीला जात असताना लँडिंगच्या प्रयत्नात ते थांबले आणि दलदलीत कोसळले. त्यात माझ्यासह १४६ प्रवासी होते. त्यातील १०१ प्रवाशी आणि १४ क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता, तर ४५ जण जखमी झाले होते. 
   
जेव्हा मला एअर इंडियाच्या विमान अपघातात रमेश विश्वासकुमार हा ब्रिटीश नागरिक चमत्कारिकपणे वाचल्याचे कळले आणि या अपघातावेळी ते ११॒ ए सीटवर बसल्याचे समजले, तेव्हा माझी जुनी आठवण ताजी झाली आणि माझ्या अंगावर काटा आला. माझ्यासोबत घडलेल्या विमान अपघाततही माझा सीट नंबर ११॒ ए हाच होता. माझा जीवही त्या अपघातातून नशिबाने वाचला होता. दरम्यान, १९९८ मध्ये बोर्डिंग पास नव्हता; परंतु वृत्तपत्रांमध्ये माझ्या सीटचा नंबर ११ ए असल्याचे सांगण्यात आले. हा अपघात माझ्यासाठी वाईट स्वप्नासारखा होता, ज्याची झळ मला आजही बसते. या अपघातानंतर मी १० वर्ष विमान प्रवास केला नाही, असेही ते म्हणाले. 

Related Articles