भारतासोबत होणार मोठा व्यापार करार   

वॉशिंग्टन : अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करारावर स्वाक्षरी झाली असून अमेरिका लवकरच भारतासोबत मोठा व्यापार करार करणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येथे केली. भारताच्या वाणिज्य विभागाचे विशेष सचिव आणि मुख्य वाटाघाटी करणारे राजेश अगरवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ व्यापार कराराच्या चर्चेसाठी वॉशिंग्टनमध्ये पोहोचले असतानाच ट्रम्प यांचे वक्तव्य समोर आले आहे. 
 
अनेक चांगले करार होत आहेत. भारतासोबत लवकरच खूप मोठा व्यापार करार होणार आहे, असे सांगत ट्रम्प यांनी चीनबरोबरील कराराचा उल्लेख केला. मात्र, त्याचा तपशील दिला नाही.आम्ही सर्वांशी करार करणार नाही. काहींना आम्ही फक्त पत्र पाठवून ‘खूप खूप धन्यवाद’ असे सांगणार आहोत, असेही ट्रम्प म्हणाले.अमेरिकेला इलेक्ट्रिक वाहने, वाइन, पेट्रोकेमिकल उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, सफरचंद, काजू आदी वस्तूंवर शुल्क सवलती हव्या आहेत.प्रस्तावित व्यापार करारात भारत रत्ने आणि दागिने, चामड्याच्या वस्तू, कपडे, प्लास्टिक, रसायने,  तेलबिया, द्राक्षे आणि केळी यासारख्या वस्तूंसाठी शुल्क सवलती मागत आहे. या कराराचे उद्दिष्ट २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत दुप्पट करण्याचे आहे. 
 

Related Articles