E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
लेण्याद्री
, (वार्ताहर) : संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तिर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथील ‘श्री गिरीजात्मज’ गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्ताने श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. संकष्टी चतुर्थीनिमित्त ‘श्री गिरिजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवाचे नैवेद्याकरीता जुन्नर येथील सुधीर व साईनाथ मारुती डोके यांनी २१ डझन आंबे तसेच कुसुर येथील सोपान, नवनाथ व शिवाजी शंकर ताजणे यांनी २ कॅरेट केळी दिलीत. मंदिरात सकाळी ६.०० वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली.
संकष्टी चतुर्थीनिमीत्त देवस्थानचे वतीने दिवसभर विविध धार्मिक विधी करण्यात आले. भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. दिवसभर भाविकांची व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ड. संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने, कर्मचारी व गोळेगाव ग्रामस्थ तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ, शिवेचीवाडी यांचे संगीत भजन झाले. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर राजगुरुनगर येथील मयुर सुरेश घुमटकर यांच्यावतीने भाविकांकरीता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
Related
Articles
पर्यटन उद्योग उध्वस्त करण्यासाठी पहलगाम दहशतवादी हल्ला : जयशंकर
01 Jul 2025
वाचक लिहितात
01 Jul 2025
स्पेन, पोर्तुगाल आणि ब्राझिलच्या दौर्यासाठी सीतारामन रवाना
01 Jul 2025
परीक्षेत डमी उमेदवार; सात जणांवर गुन्हा
02 Jul 2025
झाड तोडल्यास ५० हजाराच्या दंडाबाबत सरकारची माघार
03 Jul 2025
गगनयान मोहिमेच्या दिशेने पहिले पाऊल...
29 Jun 2025
पर्यटन उद्योग उध्वस्त करण्यासाठी पहलगाम दहशतवादी हल्ला : जयशंकर
01 Jul 2025
वाचक लिहितात
01 Jul 2025
स्पेन, पोर्तुगाल आणि ब्राझिलच्या दौर्यासाठी सीतारामन रवाना
01 Jul 2025
परीक्षेत डमी उमेदवार; सात जणांवर गुन्हा
02 Jul 2025
झाड तोडल्यास ५० हजाराच्या दंडाबाबत सरकारची माघार
03 Jul 2025
गगनयान मोहिमेच्या दिशेने पहिले पाऊल...
29 Jun 2025
पर्यटन उद्योग उध्वस्त करण्यासाठी पहलगाम दहशतवादी हल्ला : जयशंकर
01 Jul 2025
वाचक लिहितात
01 Jul 2025
स्पेन, पोर्तुगाल आणि ब्राझिलच्या दौर्यासाठी सीतारामन रवाना
01 Jul 2025
परीक्षेत डमी उमेदवार; सात जणांवर गुन्हा
02 Jul 2025
झाड तोडल्यास ५० हजाराच्या दंडाबाबत सरकारची माघार
03 Jul 2025
गगनयान मोहिमेच्या दिशेने पहिले पाऊल...
29 Jun 2025
पर्यटन उद्योग उध्वस्त करण्यासाठी पहलगाम दहशतवादी हल्ला : जयशंकर
01 Jul 2025
वाचक लिहितात
01 Jul 2025
स्पेन, पोर्तुगाल आणि ब्राझिलच्या दौर्यासाठी सीतारामन रवाना
01 Jul 2025
परीक्षेत डमी उमेदवार; सात जणांवर गुन्हा
02 Jul 2025
झाड तोडल्यास ५० हजाराच्या दंडाबाबत सरकारची माघार
03 Jul 2025
गगनयान मोहिमेच्या दिशेने पहिले पाऊल...
29 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप