स्पेन, पोर्तुगाल आणि ब्राझिलच्या दौर्‍यासाठी सीतारामन रवाना   

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्चाखालील भारतीय शिष्टमंडळ मंगळवारी स्पेन, पोर्तुगाल आणि ब्राझिलला रवाना झाले. ब्रिक्स देशांच्या परिषदेला सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर सहभागी होत आहेत.
 
सीतारामन आणि शिष्टमंडळाचा तीन देशांचा दौरा असून तो पाच जुलै रोजी  संपणार आहे. स्पेनच्या सेविल्ले येथे संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक विकास संघटनेची चौथी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. त्याचे प्रतिनिधित्व शिष्टमंडळ भारतातर्फे करणार आहे. आंतरराष्ट्रीय उद्योग मंचाच्या परिषदेत त्या प्रमुख भाषण करणार आहेत. त्या माध्यमातून परदेशी गुंतवणूक भारताकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न होतील. या वेळी त्या जर्मनी, मेरु आणि न्यूझीलंडचे ज्येष्ठ मंत्री आणि युरोपीयन महासंघाच्या गुंतवणूक बँकेच्या अध्यक्षांशी चर्चा करतील.  नंतर शिष्टमंडळ पोर्तुगाल, ब्राझिल दौर्‍यावर जाईल. ब्राझिलमध्ये  न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या  दहाव्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहणार आहे. तेथे ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकेच्या अधिकार्‍यांसोबत बैठकीत सहभागी होईल. न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या बैठकीत सीतारामन भाषण करणार आहेत.

Related Articles