रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार   

पुणे : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मोठा पाऊस झाला, त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले. हिंजवडी येथील टाटा मेट्रेाच्या कामात अडथळे आढळून आले  आहेत. त्यामुळे उद्या (सोमवार) पर्यंत हे अडथळे दूर करण्यास सांगण्यात आले आहेत. जर हे काम यावेळेत पूर्ण झाले नाही तर पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) १० कोटी रुपये दंडाची नोटीस देण्याची सूचना केली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
 
विधानभवन येथे आयोजित आषाढी वारी पालखी सोहळा आणि कोरोनाच्या संसर्गाचा आढावा बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.पावासामुळे पाणी साचणार्‍या भागात दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दिवे घाटात सध्या काम सुरू असून ते ७ मीटर रुंदीचा रस्ता आहे. तो आता ३१ मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (एनएचआय) काम करण्यात येत आहे. यावर्षी या घाटाचे रुंदीकरणाचे काम पूर्ण होत नाही, पालखी सोहळ्यादरम्यान दिवे घाटातून पालखी जाताना अनेकजण डोंगरावर बसतात त्या डोंगरावरील खडक ठिसूळ झाला असल्याने जागोजाग बॅरिकेट लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
 
घाट चढत असताना वारकर्‍यांना अडचण होऊ नये. यासाठी तेथील अनधिकृत फ्लेक्स बोर्ड, काढून टाकण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच अनधिकृत फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले असल्याचे पवार यांनी सांगितले.पवार म्हणाले, वारकरी कोणत्या मार्गाने पुण्याबाहेर पडतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यासाठी पिंपरी-चिंचवडची हद्द संपली की, पुण्याची हद्द सुरू होते. पोलिस बाजूला जातात. त्यांनतर दुसर्‍या हद्दीचे पोलिस तेथे येतात. मात्र, हद्द संपल्यानंतर पिंपर-चिंचवडच्या पोलिसांची एक-दोन किलोमीटर जावे. तसेच पुणे पोलिसांनी ग्रामीण भागात काही अंतरापर्यंत जावे. तसेच ग्रामीण भागातील जिल्ह्याच्या हद्दीबाहेर पुणे जिल्ह्याच्या पोलिसांनी पालखीतील वारकर्‍यांसोबत जावे असा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.
 
कोरोना नियंत्रणात
 
पाच वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. काही देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. सध्या केरळ पाठोपाठ महाराष्ट्रात रुग्ण आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहेत. राज्याचा आढावा आम्ही घेतो. आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर स्वत: लक्ष ठेऊन आहेत. पवार यांनी कोरोना संदर्भात आढावा घेतला. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तांनी काय उपाययोजना करायला हव्यात याबाबत चर्चा केली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्दी, खोकला असल्यास त्यासाठी रुमाल वापरण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Related Articles