दक्षिण आफ्रिकेचा बलाढ्य विजय   

क्वीन्स क्लब बुलावायो : दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या कसोटीत आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ३२८ धावांनी पराभव केला. आणि बलाढ्य विजय साकारला.  दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत ९ बाद ४१८ धावा केल्या. त्यानंतर झिम्बाब्वेचा पहिला डाव २५१ धावांवर आटोपला. त्यामुळे पहिल्या डावाअखेर आफ्रिकेला मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर दुसर्‍या डावात आफ्रिकेच्या  संघाने ८२.५ षटकांत ३६९ धावा केल्या. तर झिम्बाब्वेला ६६.२ षटकांत २०८ धावा करता आल्या. 
 
दुसर्‍या डावात फलंदाज लुहान-ड्रे प्रिटोरियस याच्या विकेटची चांगलीच चर्चा रंगली. अप्रतिम अशा स्पिन गोलंदाजीवर विन्सेंट मासेकेसा याने त्याचा त्रिफळा उडविला. दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ३ बाद १३६ अशी होती. त्यावेळी प्रिटोरियस मैदानात आला. त्याला फार मोठी खेळी करता आली नाही. केवळ ६ चेंडू खेळून तो अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. दुसर्‍या डावाच्या ३४ व्या षटकात मासेकेसा गोलंदाजी करत होता. 
 
षटकाच्या पाचव्या चेंडूवर टप्पा ऑफ स्टंपपासून खूपच बाहेर पडला. त्या टप्प्यानंतर चेंडू अचानक आतमध्ये वळला आणि ऑफ स्टंप उडाला. हा खतरनाक स्पिन पाहून फलंदाज प्रिटोरियसदेखील अवाक झाला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात लुहान-ड्रे प्रिटोरियस याने दमदार दीडशतक ठोकले. १६० चेंडूंचा सामना करत त्याने ११ चौकार आणि ४ षटकारांच्या साथीने १५३ धावा कुटल्या.याशिवाय कॉर्बिन बॉशनेही अप्रतिम शतक ठोकले. या दोन शतकांच्या जोरावर आफ्रिकेने पहिल्या डावात ४१८ धावा केल्या. तर झिम्बाब्वेच्या सीन विल्यम्सच्या १३७ धावांमुळे त्यांनी २५१ धावांपर्यंत मजल मारता आली

Related Articles