E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणातील आरोपी साकीब नाचन याचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
28 Jun 2025
मेंदूच्या पक्षाघातामुळे दिल्लीत रुग्णालयात होता दाखल
मुंबई : स्टुडन्ट इस्लामी मुव्हमेट (सिमी) या प्रतिबंधित संघटनेचा माजी पदाधिकारी व दिल्ली-पडघा आयएसआयएस दहशतवादी मॉड्युल प्रकरणातील आरोपी साकीब अब्दुल हमीद नाचन (६३) याचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. नाचनचे वकील समशेर अन्सारी यांनी नाचन याच्या मृत्युच्या वृत्ताला दुजोरा दिला. नाचन हा तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असताना त्याला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्याला दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल केले होते.
नाचन आयएसआयएसचा भारतातील प्रमुख’ म्हणजेच ‘अमीर-ए-हिंद’ असल्याचा आरोप आहे. त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता. नाचन याने देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात आयएसआयएसची विचारसरणी पसरवण्यासाठी युवकांचा मूळ विचारसरणीमधून दहशतवादाकडे वळवून संघटनेत भरती केले. तो संघटनेच्या विचारधारात्मक आणि तांत्रिक विस्तारासाठी कार्यरत होता, असा आरोप आहे.
दिल्ली-पाडघा आयएसआयएस दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात गेल्या वर्षभरात बरीच अटकसत्रे झाली.आयएसआयएस भारतात अत्यंत संघटीतरित्या काम करीत होती. ही यंत्रणा डिजिटलदृष्ट्या प्रगत आणि भारतात दहशतवादी कारवायांसाठी या संघनेकडून कट रचला जात होता. नाचनला आलेल्या ब्रेन स्ट्रोकबाबतची माहिती कुटुबियांना देण्यात आली होती. त्यानुसार त्यांचा मुलगा व जावई दिल्लीत दाखल झाले होते.
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) ठाणे जिल्ह्यातील पडघा परिसरातील बोरिवली गावात संशयित 'स्लीपर सेल'वर लक्ष ठेऊन होते. त्याप्रकरणी छापाही टाकला होता. या मॉड्यूलशी नाचन संबंधित होता. तपासात तलवारी, धारदार शस्त्रे, मोबाइल, अनेक सिम कार्ड्स, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, तसेच कथित दहशतवादी विचारसरणीचा प्रसार करणारे साहित्य जप्त करण्यात आले होते.
तपास यंत्रणांच्या मते, अटकेपूर्वीच नाचनने आपल्या नेटवर्कचा कारभार सुरू ठेवण्यासाठी बऱ्याच विश्वसनीय सहकाऱ्यांची नियुक्ती केली होती. एटीएसने नाचनच्या निवासस्थानासह त्याच्या निकटवर्तीयांच्या घरी झडती घेतली होती. बरेच संशयित समर्थकांना चौकशीसाठी बोलावले आहे. तिहार तुरुंगातून नाचनला ताब्यात घेण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयात प्रॉडक्शन वॉरंट दाखल करण्याच्या तयारीत एटीएस होती. पण त्यापूर्वीच त्याचे निधन झाले. नाचनला दोन मुलगे आहेत. त्यापैकी एक शमील सध्या महाराष्ट्रातील आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात तुरुंगात आहे.
Related
Articles
विधानसभेची मालकी १४ कोटी जनतेची
19 Jul 2025
कर्नाटकात नवीन जातनिहाय जनगणना २२ सप्टेंबरपासून
24 Jul 2025
इंजिनियर राशीदला पॅरोल
23 Jul 2025
राहुल यांच्या विधानावर मार्क्सवादी नेत्याची टीका
20 Jul 2025
बीएमसीसी, पूना प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली
19 Jul 2025
कर्करोग नियंत्रणासाठी उपायोजना करा
24 Jul 2025
विधानसभेची मालकी १४ कोटी जनतेची
19 Jul 2025
कर्नाटकात नवीन जातनिहाय जनगणना २२ सप्टेंबरपासून
24 Jul 2025
इंजिनियर राशीदला पॅरोल
23 Jul 2025
राहुल यांच्या विधानावर मार्क्सवादी नेत्याची टीका
20 Jul 2025
बीएमसीसी, पूना प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली
19 Jul 2025
कर्करोग नियंत्रणासाठी उपायोजना करा
24 Jul 2025
विधानसभेची मालकी १४ कोटी जनतेची
19 Jul 2025
कर्नाटकात नवीन जातनिहाय जनगणना २२ सप्टेंबरपासून
24 Jul 2025
इंजिनियर राशीदला पॅरोल
23 Jul 2025
राहुल यांच्या विधानावर मार्क्सवादी नेत्याची टीका
20 Jul 2025
बीएमसीसी, पूना प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली
19 Jul 2025
कर्करोग नियंत्रणासाठी उपायोजना करा
24 Jul 2025
विधानसभेची मालकी १४ कोटी जनतेची
19 Jul 2025
कर्नाटकात नवीन जातनिहाय जनगणना २२ सप्टेंबरपासून
24 Jul 2025
इंजिनियर राशीदला पॅरोल
23 Jul 2025
राहुल यांच्या विधानावर मार्क्सवादी नेत्याची टीका
20 Jul 2025
बीएमसीसी, पूना प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली
19 Jul 2025
कर्करोग नियंत्रणासाठी उपायोजना करा
24 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)