E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अत्याचाराविरोधात शिक्षेची तरतूद करा : डॉ. चलवादी
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
विश्रांतवाडी
: राज्यात स्वतंत्र ’अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासोबतच अनुसूचित जाती आणि जमाती या दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतांना एससी-एसटी बांधवांवरील अत्याचाराविरोधात तात्काळ शिक्षा करण्याची आवश्यकता आहे, असे मत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले.
५१ व्या जनजाती सल्लागार परिषदेने महाराष्ट्रात स्वतंत्र अनुसूचित जनजाती आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली होती. आयोगाच्या स्थापनेमुळे अनुसूचित जमातींच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येणार असले तरी मागासवर्गीयांवर होणार्या अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक आहे,अशी खंत डॉ. चलवादी यांनी व्यक्त केली. आयोगाने अशा प्रकारच्या अत्याचाराची तात्काळ दखल घेत योग्य दिशानिर्देश दिल्यास न्याय मिळण्यास गती मिळेल,असे ही डॉ. चलवादी म्हणाले.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) २०२१ सालच्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात अनुसूचित जातीविरोधात एकूण २,५०९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी २,१९८ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले, परंतु केवळ ११४ प्रकरणांमध्येच दोष सिद्ध झाले.२०२२ मध्ये हेच प्रमाण अधिक वाढून, एससी विरोधातील गुन्ह्यांची संख्या २,६२३ वर पोहोचली. त्यात २,२८६ प्रकरणांत आरोपपत्र दाखल झाली, तर १३९ प्रकरणांतच शिक्षा झाली, म्हणजेच दोषी ठरवले जाण्याचे प्रमाण केवळ ५.२ टक्के इतके राहिले. दोष सिद्धीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने अत्याचारात दिवसागणिक वाढ होत असल्याचे मत डॉ. चलवादी यांनी व्यक्त केले.
अनुसूचित जमातींविरोधातील गुन्ह्यांच्या बाबतीतही स्थिती धोकादायक आहे. २०२१ मध्ये एसटी वरील अन्यायाविरोधात ६२८ गुन्ह्यांची नोंद झाली, त्यातील ५५७ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आली.परंतु त्यावर्षी केवळ १२ प्रकरणांमध्येच आरोपी दोषी सिद्ध झाले.२०२२ मध्ये या गुन्ह्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली. त्यावर्षी ७२४ गुन्ह्यांची नोंद झाली.
Related
Articles
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
01 Jul 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
मुख्यमंत्री बदलाबाबत पक्षश्रेष्ठच निर्णय घेतील : खर्गे
01 Jul 2025
नाणेघाटात पर्यटकांची गर्दी वाढली
03 Jul 2025
ब्रिटनचे ‘एफ-३५ बी’ हेरगिरीसाठी भारतात?
01 Jul 2025
चहापानावर बहिष्कार
30 Jun 2025
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
01 Jul 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
मुख्यमंत्री बदलाबाबत पक्षश्रेष्ठच निर्णय घेतील : खर्गे
01 Jul 2025
नाणेघाटात पर्यटकांची गर्दी वाढली
03 Jul 2025
ब्रिटनचे ‘एफ-३५ बी’ हेरगिरीसाठी भारतात?
01 Jul 2025
चहापानावर बहिष्कार
30 Jun 2025
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
01 Jul 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
मुख्यमंत्री बदलाबाबत पक्षश्रेष्ठच निर्णय घेतील : खर्गे
01 Jul 2025
नाणेघाटात पर्यटकांची गर्दी वाढली
03 Jul 2025
ब्रिटनचे ‘एफ-३५ बी’ हेरगिरीसाठी भारतात?
01 Jul 2025
चहापानावर बहिष्कार
30 Jun 2025
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
01 Jul 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
मुख्यमंत्री बदलाबाबत पक्षश्रेष्ठच निर्णय घेतील : खर्गे
01 Jul 2025
नाणेघाटात पर्यटकांची गर्दी वाढली
03 Jul 2025
ब्रिटनचे ‘एफ-३५ बी’ हेरगिरीसाठी भारतात?
01 Jul 2025
चहापानावर बहिष्कार
30 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप