E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
वॉशिंग्टन
: पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर यांना अमेरिकेच्या २५० व्या लष्कर दिनानिमित्त वॉशिंग्टनमध्ये होणार्या लष्करी संचलनासाठी निमंत्रण देण्यात आले असून, ते या समारंभात उपस्थित राहणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.या दौर्यादरम्यान, जनरल मुनीर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील आणि पेंटागॉनमधील वरिष्ठ अधिकार्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, १४ जून रोजी होणार्या संचलनाच्या दिवशीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ७९ वा वाढदिवस देखील आहे.
दौर्याची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकेल कुरिला यांनी काँग्रेसच्या एका सुनावणीत जनरल मुनीर यांचे कौतुक करताना, पाकिस्तान हा दहशतवादविरोधी लढ्यातील अत्यंत विश्वासार्ह भागीदार आहे, असे मत व्यक्त केले होते. कुरिला आणि मुनीर हे गेल्या दोन वर्षांत तिसर्यांदा भेटणार आहेत.
हा आणखी एक राजनैतिक पराभव : काँग्रेस
या दौर्यामुळे भारतात राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसचे कम्युनिकेशन सेलचे प्रमुख जयराम रमेश यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हे तेच व्यक्ती आहेत, ज्यांनी पहलगाम हल्ल्याआधी प्रक्षोभक वक्तव्ये केली होती. त्यामुळे अमेरिका नेमके काय करते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रमेश यांच्या म्हणण्यानुसार, हे निमंत्रण म्हणजे भारताचा आणखी एक मोठा राजनैतिक पराभव आहे.
पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यासाठी आक्रमक राजनैतिक मोहीम हाती घेतली असून, ३३ देशांमध्ये सर्वपक्षीय प्रतिनिधी पाठवून विरोध नोंदवला जात आहे.
दौर्याला पाकिस्तानी समुदायाचा विरोध
दरम्यान, मुनीर यांच्या अमेरिकेतील दौर्याला पाकिस्तानातील विरोधी पक्ष पीटीआय (इम्रान खान यांचा पक्ष) कडूनही तीव्र विरोध होतो आहे. पीटीआयचे परदेशविषयक सचिव सज्जाद बुरकी यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत म्हटले, की या सरकारसोबत कोणताही करार पाकिस्तानातील जनतेला मान्य नसेल. त्यांनी १४ जून रोजी वॉशिंग्टन येथील पाकिस्तान दूतावासासमोर निदर्शने करण्याचे आवाहनही केले आहे.
Related
Articles
नक्षलग्रस्त बस्तरपर्यंत आता रेल्वेचे जाळे
28 Jun 2025
क्रिस वोक्सने उडविला राहुलचा त्रिफळा
03 Jul 2025
राजस्तानात सीमेजवळ अमली पदार्थ जप्त
01 Jul 2025
हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी
02 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
वाहनाच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू
02 Jul 2025
नक्षलग्रस्त बस्तरपर्यंत आता रेल्वेचे जाळे
28 Jun 2025
क्रिस वोक्सने उडविला राहुलचा त्रिफळा
03 Jul 2025
राजस्तानात सीमेजवळ अमली पदार्थ जप्त
01 Jul 2025
हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी
02 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
वाहनाच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू
02 Jul 2025
नक्षलग्रस्त बस्तरपर्यंत आता रेल्वेचे जाळे
28 Jun 2025
क्रिस वोक्सने उडविला राहुलचा त्रिफळा
03 Jul 2025
राजस्तानात सीमेजवळ अमली पदार्थ जप्त
01 Jul 2025
हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी
02 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
वाहनाच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू
02 Jul 2025
नक्षलग्रस्त बस्तरपर्यंत आता रेल्वेचे जाळे
28 Jun 2025
क्रिस वोक्सने उडविला राहुलचा त्रिफळा
03 Jul 2025
राजस्तानात सीमेजवळ अमली पदार्थ जप्त
01 Jul 2025
हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी
02 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
वाहनाच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू
02 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप