E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
फडणवीस-राज ठाकरे यांच्यात बैठक
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीला ब्रेक?
मुंबई
, (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गुरुवारी वांद्रे येथील ’ताज लँडस एंड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली. दोघांमधील बैठकीत झालेल्या चर्चेचा अधिकृत तपशील बाहेर आला नसला तरीही या दोघांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झालेली असू शकते. या दोघांची आजची बैठक पूर्वनियोजित असल्याचे सांगण्यात येते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आजच्या दैनंदिन कार्यक्रमात राज ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीचा कोणताही उल्लेख नव्हता. फडणवीस यांच्या आजच्या सरकारी बैठका दुपारी १२ वाजल्यानंतर सह्याद्री या अतिथीगृहावर दाखवण्यात आल्या होत्या. मात्र, आज सकाळी फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांचाही ताफा ’ ताज लँडस एंड’ मध्ये हॉटेलात शिरला. या हॉटेलमधीलच एका कक्षात दोघांची भेट होऊन चर्चा झाली. या दोघांच्या भेटीने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीला ब्रेक लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला पराभवाचा सामना करावा लागला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाटी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत कोरी राहिली. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचा मुकाबला करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विशेषतः मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी तसे संकेत दिले होते. त्यानुसार पडद्याआड ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरु असताना राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाल्याचे समोर आल्याने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी सार्वधिक प्रतिष्ठेची आहे. भाजपसारखा पक्ष राज्याच्या सत्तेत असल्याने ठाकरे यांच्यासाठी मुंबईची निवडणूक सोपी राहिलेली नाही. अशावेळी मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, यासाठी मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी झाली. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, आजच्या फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या राजकीय भेटीने उद्धव ठाकरे गटात मनसेबद्दल संशय निर्माण झाला आहे.
Related
Articles
पाकिस्तानी संघाला भारतात येण्याची केंद्र सरकारची परवानगी
04 Jul 2025
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
29 Jun 2025
क्रिस वोक्सने उडविला राहुलचा त्रिफळा
03 Jul 2025
दुसर्या कसोटीतून बुमराला विश्रांती
28 Jun 2025
सलग दुसर्या दिवशी शेअर बाजारात घसरण
04 Jul 2025
ज्येष्ठ गायक आणि वादक इकबाल दरबार यांचे निधन
28 Jun 2025
पाकिस्तानी संघाला भारतात येण्याची केंद्र सरकारची परवानगी
04 Jul 2025
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
29 Jun 2025
क्रिस वोक्सने उडविला राहुलचा त्रिफळा
03 Jul 2025
दुसर्या कसोटीतून बुमराला विश्रांती
28 Jun 2025
सलग दुसर्या दिवशी शेअर बाजारात घसरण
04 Jul 2025
ज्येष्ठ गायक आणि वादक इकबाल दरबार यांचे निधन
28 Jun 2025
पाकिस्तानी संघाला भारतात येण्याची केंद्र सरकारची परवानगी
04 Jul 2025
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
29 Jun 2025
क्रिस वोक्सने उडविला राहुलचा त्रिफळा
03 Jul 2025
दुसर्या कसोटीतून बुमराला विश्रांती
28 Jun 2025
सलग दुसर्या दिवशी शेअर बाजारात घसरण
04 Jul 2025
ज्येष्ठ गायक आणि वादक इकबाल दरबार यांचे निधन
28 Jun 2025
पाकिस्तानी संघाला भारतात येण्याची केंद्र सरकारची परवानगी
04 Jul 2025
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
29 Jun 2025
क्रिस वोक्सने उडविला राहुलचा त्रिफळा
03 Jul 2025
दुसर्या कसोटीतून बुमराला विश्रांती
28 Jun 2025
सलग दुसर्या दिवशी शेअर बाजारात घसरण
04 Jul 2025
ज्येष्ठ गायक आणि वादक इकबाल दरबार यांचे निधन
28 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया