दुसर्‍या कसोटीतून बुमराला विश्रांती   

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी २ जुलैपासून सुरु होणार आहे. पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारल्यानंतर दुसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांना ३७१ धावांचा बचाव करण्यात अपयश आलं होतं. 
टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या मार्‍या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले होते. आता टीम इंडियाच्या नियोजनानुसार दुसर्‍या कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाणार हे निश्चित आहे. यामुळं पहिल्यापासून टीम इंडियाचा गोलंदाजीचा मारा कमजोर दिसत असताना जसप्रीत बुमराहची जागा कोण भरुन काढणार हा प्रश्न आहे.  
 
टीम इंडियाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी जसप्रीत बुमराह या कसोटीत तीन कसोटी खेळणार असल्याचं म्हटलं. याशिवाय जसप्रीत बुमराहनं देखील इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर तो या दौर्‍यात केवळ  ३ कसोटी खेळणार असल्याचं म्हटलं होतं. बुमराहवर गोलंदाजी करताना येणारा ताण लक्षात घेऊन ३ कसोटीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यावेळी भारतीय निवड समिती, कोच आणि कॅप्टन यांना भारतानं पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यास बुमराहाला विश्रांती देणं सोपं ठरेल असं वाटलं होतं.  
 
एजबेस्टन कसोटी २ जुलैपासून सुरु होणार आहे. या कसोटीत बुमराहला विश्रांती दिली जाईल. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया ०-१ नं पिछाडीवर आहे.आता जसप्रीत बुमराह शिवाय भारताच्या गोलंदाजीची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. टीम इंडियासमोर सध्या दोन पर्याय आहेत. यामध्ये आकाश दीप आणि अर्शदीप सिंह या दोघांचा पर्याय आहे. 
 
दोन्ही खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केलेलं आहे. बुमराहला विश्रांती दिल्यास एजबेस्टन कसोटीचं तिकीट कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. 
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरनं पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी केली होती. यशस्वी जयस्वास, शुभमन जयस्वाल, रिषभ पंत, केएल राहुल यांनी शतकी खेळी केली होती.टीम इंडियाच्या मधल्या फळीला आणि लोअर मिडल ऑर्डरला चांगली फलंदाजी करण्यात अपयश आलं होतं. लीडस कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये टीम इंडियाची मधली फळी आणि लोअर मिडल ऑर्डर अपयशी ठरली होती, त्यात सुधारणं करणं आवश्यक आहे.
 

Related Articles