E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
पुणे
: प्रणव घोलकर व नैशा रेवसकर यांनी अग्रमानांकनास साजेसा खेळ करीत शारदा स्पोर्ट्स सेंटरने आयोजित केलेल्या शारदा जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे १९ वर्षाखालील मुले व मुली या गटात विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा शारदा ग्रुप व डेक्कन डाईज अँड केमिकल्स यांनी पुरस्कृत केली आहे. ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे दिनांक १५ जून पर्यंत सुरू राहणार आहे. या मोसमातील ही पहिलीच मानांकन स्पर्धा आहे. मुलांच्या १९ वर्षाखालील गटात अग्रमानांकित खेळाडू प्रणव घोलकर (टॉस अकादमी) याने अंतिम फेरीत क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू कौस्तुभ गिरगावकर याला ११-७,११-६, ११-४,११-४ असे सरळ चार गेम्स मध्ये पराभूत केले त्याने काउंटर अटॅक पद्धतीचा बहारदार खेळ केला. उपांत्य फेरीत त्याने चौथ्या मानांकित वेदांग जोशी याचे आव्हान ११-६,११-८,११-७ असे सरळ तीन गेम्स मध्ये संपुष्टात आणले तर तृतीय मानांकित खेळाडू कौस्तुभ गिरगावकर याने सातव्या मानांकित श्रेयस माणकेश्वर याला ११-८,११-९, ४-११, ११-७ असे पराभूत केले.
मुलींच्या १९ वर्षाखालील गटाच्या अंतिम सामन्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू व अग्रमानांकित नैशा रेवसकर (एम्स अकादमी) टॉस अकादमीच्या तनया अभ्यंकर हिच्यावर ९-११,११-६,११-६,११-८,११-७ अशी मात केली. पहिली गेम गमावल्यानंतर तिने खेळावर नियंत्रण मिळवले आणि शेवटपर्यंत वर्चस्व राखले तिने टॉपस्पिन फटक्यांचा सुरेख खेळ केला. त्याआधी उपांत्य फेरीत तिने वेदांगी जुमडे हिच्यावर ११-५,११-४,११-७ असा दणदणीत विजय मिळविला. तृतीय मानांकित तनया अभ्यंकर (टॉस अकादमी) हिने द्वितीय मानांकित खेळाडू जान्हवी फणसे हिला ७-११,११-९,११-८,११-९ असे पराभूत करीत आश्चर्याचा धक्का दिला.
Related
Articles
थेरगावात पार्किंगमधील चार दुचाकी पेटविल्या
30 Jun 2025
हुजुरपागा शाळेतील विद्यार्थिनींचा सुवर्ण महोत्सवी मेळा
30 Jun 2025
सिंधू करार आधीच स्थगित;लवादाला अधिकार नाही
28 Jun 2025
पाच जणांकडून वाहनांची तोडफोड
27 Jun 2025
आपलेपणाच्या सूत्रात संघाला हिंदूना बांधायचे
28 Jun 2025
माउलींच्या पादुकांचे शाही स्नान थाटात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप