E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
वृत्तवेध
तुर्कीची अर्थव्यवस्था आधीच व्हेंटिलेटरवर होती. आता भारताच्या बहिष्कारामुळे तिचा गुदमरण्याचा दर वाढू लागला आहे. ‘रॉयटर्स’च्या एका सर्वेक्षणानुसार, २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये तुर्कीची आर्थिक वाढ २.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे. ती संपूर्ण वर्षभर तीन टक्के राहू शकते.
भारतात तुर्की वस्तू आणि सेवांवर बहिष्कार वाढला आहे. यामुळे तुर्कीचे आर्थिक संकट आणखी वाढू शकते. भारत आणि तुर्कीमधील राजनैतिक आणि आर्थिक संबंध वेगाने बिघडत आहेत. याचे कारण ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान तुर्कीने पाकिस्तानला दिलेला पाठिंबा. भारतातील लोक आणि व्यवसाय दोघेही तुर्कीशी सर्व संबंध तोडण्याची मागणी करत आहेत. याचा तुर्कीच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताने तुर्कीसोबतचा मोठा जहाजबांधणी करार रद्द केला आहे. इतर अनेक आर्थिक पावलेदेखील उचलण्यात आली आहेत. भारतातील लोक तुर्की वस्तूंवर बहिष्कार टाकत आहेत आणि तिथे जाणे टाळत आहेत. यामुळे तुर्कीची अर्थव्यवस्था आणि राजकीय परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
‘इंडियन ब्रँड इक्विटी फाउंडेशन’च्या मते भारताने २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये तुर्कीमधून ३.७८ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या. आता भारत सरकारने तुर्की कंत्राटदारांसोबतचा २.३ अब्ज डॉलर्सचा जहाजबांधणी करार रद्द केला आहे. यावरून दिसून येते की, राजनैतिक पातळीवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
भारताचा विरोध केवळ व्यापार आणि संरक्षण पुरता मर्यादित नाही. तो शिक्षण आणि संस्कृतीपर्यंतही पसरला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामियासारख्या भारतीय संस्था आणि तुर्की संस्थांमधील सहकार्य धोक्यात आहे. सार्वजनिक दबावामुळे राजनैतिक संबंध बिघडत आहेत. दरम्यान, तुर्कीची अर्थव्यवस्था गेल्या काही दशकांमधील सर्वात वाईट काळातून जात आहे. मार्च २०२५ मध्ये महागाई दर ३८.०१ टक्के होता. गेल्या वर्षीच्या ७५ टक्क्यांच्या शिखरापेक्षा कमी आहे. अध्यक्ष एर्दोगान यांच्या वादग्रस्त आर्थिक धोरणामुळे तुर्कीची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
जगातील सर्वात वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या भारताच्या बहिष्कारामुळे तुर्कीचा परकीय चलनाचा प्रवेश आणखी कमी होईल. यामुळे बाजारपेठेत विविधता आणण्याची त्याची क्षमतादेखील कमी होईल. तसेच, अस्थिर आर्थिक वातावरण स्थिर करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होईल.
Related
Articles
संंसदेची सुरक्षा भेदणार्या दोघांना जामीन
02 Jul 2025
डॉ. आंबेडकरांसारखा महान नेता देशाला मिळवून देण्यात शाहू महाराजांचा सिंहाचा वाटा
27 Jun 2025
पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप
02 Jul 2025
शेअर बाजाराची उसळी
28 Jun 2025
मिळकत कर ७ जुलैपर्यंत भरता येणार
01 Jul 2025
राजस्तानात सीमेजवळ अमली पदार्थ जप्त
01 Jul 2025
संंसदेची सुरक्षा भेदणार्या दोघांना जामीन
02 Jul 2025
डॉ. आंबेडकरांसारखा महान नेता देशाला मिळवून देण्यात शाहू महाराजांचा सिंहाचा वाटा
27 Jun 2025
पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप
02 Jul 2025
शेअर बाजाराची उसळी
28 Jun 2025
मिळकत कर ७ जुलैपर्यंत भरता येणार
01 Jul 2025
राजस्तानात सीमेजवळ अमली पदार्थ जप्त
01 Jul 2025
संंसदेची सुरक्षा भेदणार्या दोघांना जामीन
02 Jul 2025
डॉ. आंबेडकरांसारखा महान नेता देशाला मिळवून देण्यात शाहू महाराजांचा सिंहाचा वाटा
27 Jun 2025
पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप
02 Jul 2025
शेअर बाजाराची उसळी
28 Jun 2025
मिळकत कर ७ जुलैपर्यंत भरता येणार
01 Jul 2025
राजस्तानात सीमेजवळ अमली पदार्थ जप्त
01 Jul 2025
संंसदेची सुरक्षा भेदणार्या दोघांना जामीन
02 Jul 2025
डॉ. आंबेडकरांसारखा महान नेता देशाला मिळवून देण्यात शाहू महाराजांचा सिंहाचा वाटा
27 Jun 2025
पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप
02 Jul 2025
शेअर बाजाराची उसळी
28 Jun 2025
मिळकत कर ७ जुलैपर्यंत भरता येणार
01 Jul 2025
राजस्तानात सीमेजवळ अमली पदार्थ जप्त
01 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप