डॉ. आंबेडकरांसारखा महान नेता देशाला मिळवून देण्यात शाहू महाराजांचा सिंहाचा वाटा   

लक्ष्मण रानवडे यांचे प्रतिपादन

पिंपरी : राजश्री शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशातून उच्च शिक्षण घेऊन भारतात आल्यानंतर ते भारतात नोकरी करत असताना त्यांना माणगाव येथील दलित परिषदेत यापुढे हा तुमचा नेता म्हणून डॉ. बाबासाहेबांची ओळख करून दिली. दलितांना  व देशाला महान नेता बाबासाहेबांच्या रूपाने या देशाला मिळावा यासाठी त्यांनी  सारी शक्ती त्यांच्या मागे उभी केली. असे प्रतिपादन अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे यांनी येथे केले 
 
राजर्षी  छत्रपती शाहू  महाराज यांना मराठा सेवा संघ ज्येष्ठ नागरी सेवा संघाचे सचिव  सुरेश इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी लहुजीउस्ताद सेनेचे अध्यक्ष  राजू आवळे, ऑल इंडिया जमत- ए -सलमानचे सचिव - जमील भाई, सह सचिव  चांदभाई  शेख, मराठा सेवा संघाचे राघव होजगे, श्रीजगद्गुरू प्रतिष्ठानचे अ‍ॅड. सुनील रानवडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी डॉ. लक्ष्मण रानवडे  पुढे म्हणाले कि शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांना कोणत्याही जाती व्यवस्थेमध्ये बांधता येणार नाही ते सर्व रयतेचे नेते व आदरस्थानी आहेत. 

Related Articles