E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लोणावळा परिसरात वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
पिंपरी : जिल्ह्यातील लोणावळा परिसरात ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी व अपघात होऊ नये, तसेच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून दुर्घटना घडू नये याकरिता सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पर्यटनस्थळ परिसरात ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार व गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार वाहतुकीमध्ये बदल करुन पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
लोणावळा परिसरातील एकविरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण या परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सदर आदेश देण्यात आले आहेत.
मौजे भाजे गावाकडून येणारी वाहतुक मौजे मळवली-कार्ला गावाकडे जाण्यासाठी वाहतूक बंद करण्यात येत असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाने मौजे भाजे येथून पाटण ब्रिजवरुन डावीकडे देवले औंढे ब्रिजहून पुढे सर्व्हिस रोडने कुसगाव लोणावळा येथून जुना हायवे व एक्सप्रेस हायवेकडे जातील. मौजे औंढे-देवले रोडने मळवली भाजे येथे येणारी वाहतूक बंद करण्यात येत असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाने मौजे औंढे-लोणावळा-कर्ला फाटा-मळवली-भाजे अशी जातील.
मोजे मळवली व मौजे सदापूर येथून मौजे कार्ला येथे येणारी वाहतुक बंद करण्यात येत असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाने मौजे मळवली-सदापूर-वाकसई फाट्यावरुन जुन्या हायवेकडे जातील. मौजे वाकसई फाटा येथून सदापूर मळवली कडे जाणारी वाहने बंद करण्यात येत असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाने मौजे कार्ला फाटा येथून सरळ पुढे मळवली, पाटण, माजे अशी वाहने जातील.
मौजे भाजे ते लोहगड या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात येत असून, लोहगडाकडे जाण्यासाठी भाजे येथून पर्यायी मार्ग असेल. लोहगड येथून पुणे-मुंबईकडे जाणार्या चारचाकी वाहनांनी लोहगड-दुधिवरे खिंड-औंढोली-औंढे यामार्गे पुणे-मुंबई व मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे या मार्गाचा किंवा लोहगड-दुधिवरे-खिंड-पवनानगर या मार्गे नवीन पुणे-मुंबई व मुंबई-पुणे हायवे या मार्गाचा वापर करावा. तसेच लोहगड येथून मुंबई किंवा पुणेकडे जाणारी दोनचाकी व तीनचाकी वाहनांनी लोहगड-दुधिवरे-खिंड-औढोली-आँढे-आँढे ब्रीजवरुन कुसगाव-लोणावळा येथून जुना मुंबई-पुणे व पुणे-मुंबई या मार्गाचा वापर करावा.
या कालावधीत जुना मुंबई-पुणे व पुणे-मुंबई रोडवरील कार्ला फाटा ते वेहेरगाव या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. वाहतूक बदलाबाबतचे आदेश स्थानिक रहिवाश्यांना लागू नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Related
Articles
राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
01 Jul 2025
जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल २०२६ पासून
30 Jun 2025
पावसाने ओलांडला हजार मिलिमीटरचा टप्पा
27 Jun 2025
केरळचा आदर्श
29 Jun 2025
उत्तराखंडमध्ये महाबळेश्वरमधील सहा पर्यटक सुरक्षित
03 Jul 2025
पाकिस्तान पुन्हा उभारत दहशतवादी तळ
30 Jun 2025
राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
01 Jul 2025
जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल २०२६ पासून
30 Jun 2025
पावसाने ओलांडला हजार मिलिमीटरचा टप्पा
27 Jun 2025
केरळचा आदर्श
29 Jun 2025
उत्तराखंडमध्ये महाबळेश्वरमधील सहा पर्यटक सुरक्षित
03 Jul 2025
पाकिस्तान पुन्हा उभारत दहशतवादी तळ
30 Jun 2025
राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
01 Jul 2025
जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल २०२६ पासून
30 Jun 2025
पावसाने ओलांडला हजार मिलिमीटरचा टप्पा
27 Jun 2025
केरळचा आदर्श
29 Jun 2025
उत्तराखंडमध्ये महाबळेश्वरमधील सहा पर्यटक सुरक्षित
03 Jul 2025
पाकिस्तान पुन्हा उभारत दहशतवादी तळ
30 Jun 2025
राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
01 Jul 2025
जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल २०२६ पासून
30 Jun 2025
पावसाने ओलांडला हजार मिलिमीटरचा टप्पा
27 Jun 2025
केरळचा आदर्श
29 Jun 2025
उत्तराखंडमध्ये महाबळेश्वरमधील सहा पर्यटक सुरक्षित
03 Jul 2025
पाकिस्तान पुन्हा उभारत दहशतवादी तळ
30 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप