पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या   

उरुळी कांचन, (वार्ताहर) : पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथे घडली आहे. सुरज दामोदर पवार (वय ३२, रा. इनामदारवस्ती चिंतामणी हॉस्पिटलचे पाठीमागे जेधे चाळ, कोरेगावमुळ ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणाचे वडील दामोदर निवृत्ती पवार, (वय ६०, धंदा-शेती रा. वाल्हे, वागदरवाडी ता. पुरंदर) यांनी बुधवारी  दुपारी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
 
मयुरी सुरज पवार उर्फ मयुरी अनिल जाधव, (वय २६, रा. जेथे चाळ इनामदारवस्ती, कोरेगाव मुळ, रा. सध्या सोरतापवाडी ता. हवेली) हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली. आत्महत्या केलेल्या तरुणाने मोबाईलमध्ये आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचे म्हणत राहत्या घरी साडीने बेडरूममध्ये गळफास घेवुन आत्महत्या करीत असल्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी करून ठेवले होते. हि घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील जेधे चाळ इनामदारवस्ती परिसरात घडली आहे. कौटुंबिक तणावाचे गंभीर परिणाम कसे होऊ शकतात, याचे हे एक दुर्दैवी उदाहरण या घटनेमुळे समोर आले आहे. मुलगा सुरज पवार याच्या आत्महत्येस प्रवृत्त करून त्याच्या मरणास त्याची पत्नी मयुरी ही कारणीभुत आहे. म्हणून मयुरी पवार उर्फ मयुरी जाधव हीचे विरुध्द कायदेशीर तक्रार दिली आहे.

Related Articles