E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मोदींकडून जखमींची विचारपूस
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
अहमदाबाद
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विमान दुर्घटनास्थळाचा दौरा केला. अपघात कसा झाला ? याची पाहणी केली. तसेच जखमींची भेट घेतली आणि त्यांच्याकडून अपघातासंदर्भातील माहिती जाणून घेतली.विमान दुर्घटनेतील जखमींवर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथील जखमींची विचारपूस पंतप्रधान मोदी यांनी काल केली. लागेल ती मदत तातडीने दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. घटनास्थळी ते सुमारे २० मिनिटे होते. त्यानंतर ते डॉक्टरांच्या वसतिगृहाजवळ गेले. या प्रसंगी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू आणि गृह राज्यमंत्री हरिष संघवी त्यांच्यासोबत होते.
त्यांनी मोदी यांना विमान दुर्घटना आणि वसतिगृहाजवळ घडलेल्या घटनेचा तपशील दिला. रुग्णालयात २६ जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, २६५ पैकी सहा जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आले आहेत. तत्पूर्वी मृतांच्या नातेवाइकांनी त्यांची ओळख पटविली होती.
डीएनएद्वारे ओळख पटविणार
अनेक प्रवशांचा कोळसा झाला आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्याचे काम अवघड बनले आहे. प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे डीएनए नमुने गोळा केले जातील. चाचणी करण्यासाठी ७२ तासांचा अवधी लागणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. २६५ मृतदेह रुग्णालयात पुढील तपासणीसाठी आणले आहेत. सहा जणांची ओळख पटली आहे. त्यांचे चेहरे सुस्थितीत असल्याने ओळख पटविणे सोपे झाले, अशी माहिती पोलिस अधिकारी चिराग गोसाई यांनी दिली. आतापर्यंत २१५ जणांनी डीएनए नमुने देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना बी. जे. रुग्णालयात ते देण्यासाठी पाठवले आहे. पडताळणी करण्यासाठी ७२ तास लागू शकतात. नमुने जुळल्यानंतर मृतदेह नातेवाइकांकडे अंत्यविधीसाठी दिले जातील. दरम्यान, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह रुग्णालयात अन्य प्रवाशांसोबत ठेवला आहे. पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी रुपाणी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले असून त्यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
दरवाजा तुटला आणि वाचलो!
विश्वास कुमार रमेश यांनी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेची थरारक माहिती दिली. ते म्हणाले, मी विमानातून उडी मारली नाही. माझ्या आसनाजवळ दरवाजा होता, तो तुटला आणि मी आसनासह बाहेर फेकलो गेलो. त्याआधीच विमानाने पेट घेतला होता. माझ्या डोळ्यांसमोर एक हवाई सुंदरी व माझ्या पुढे बसलेले एक काका आणि काकू होरपळत होते. मी ते पाहत असतानाच बाहेर फेकला गेलो. विश्वास कुमार यांनी आज तकला सांगितले, की विमान धावपट्टीवरून वेग धरत होते. तेव्हाच आमच्यापैकी काही जणांना विचित्र वाटू लागले होते. पाच-दहा सेकंदांसाठी सगळे काही थांबल्यासारखे वाटले. मग मोठे आवाज, मग भयानक शांतता, मग अचानक हिरवे दिवे लागले, मग पांढरे दिवे लागले, मग वैमानिकाने उड्डाणासाठी पूर्ण ताकद लावली, विमानाने उड्डाण केले आणि काही सेकंदांनी विमान आदळल्याचा धक्का बसला. विमान एका इमारतीत घुसत असल्यासारखे वाटले.
Related
Articles
स्मृतीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजय
30 Jun 2025
भारताने दोन वेळा अकारण आक्रमण केले
30 Jun 2025
तीनही आरोपींना महाविद्यालयातून काढले
02 Jul 2025
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
03 Jul 2025
सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनी अटक
01 Jul 2025
रवींद्र जडेजाचे २३ वे अर्धशतक
04 Jul 2025
स्मृतीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजय
30 Jun 2025
भारताने दोन वेळा अकारण आक्रमण केले
30 Jun 2025
तीनही आरोपींना महाविद्यालयातून काढले
02 Jul 2025
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
03 Jul 2025
सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनी अटक
01 Jul 2025
रवींद्र जडेजाचे २३ वे अर्धशतक
04 Jul 2025
स्मृतीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजय
30 Jun 2025
भारताने दोन वेळा अकारण आक्रमण केले
30 Jun 2025
तीनही आरोपींना महाविद्यालयातून काढले
02 Jul 2025
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
03 Jul 2025
सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनी अटक
01 Jul 2025
रवींद्र जडेजाचे २३ वे अर्धशतक
04 Jul 2025
स्मृतीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजय
30 Jun 2025
भारताने दोन वेळा अकारण आक्रमण केले
30 Jun 2025
तीनही आरोपींना महाविद्यालयातून काढले
02 Jul 2025
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
03 Jul 2025
सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनी अटक
01 Jul 2025
रवींद्र जडेजाचे २३ वे अर्धशतक
04 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप
6
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले