बिजापूरमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार   

बिजापूर : छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत ४० लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी नेता ठार झाला, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.गौतम उर्फ सुधाकर असे या मृत नक्षलवाद्याचे नाव आहे. तो नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. तो मारला गेल्याने नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
 
काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलाने बस्तर विभागात सीपीआयचा (माओवादी) सरचिटणीस नंबला केशव राव उर्फ बसवराजू याचा चकमकीत खात्मा केला होता. त्यानंतर, आता सुधाकर मारला गेला. पण, अद्याप याची पोलिसांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना इंद्रावती उद्यानात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे, त्यांनी उद्यानास घेराव घातला. त्यावेळी ही चकमक उडाली.

Related Articles