E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पुणेरी बाप्पा संघाचा विजय
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
पुणे
: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२५ स्पर्धेत तिसर्या दिवशी निकित धुमाळ(३-१४) याने केलेल्या अचूक गोलंदाजीसह मुर्तझा ट्रंकवालाच्या उपयुक्त ३२ धावांच्या खेळीच्या जोरावर ४एस पुणेरी बाप्पा संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तो यशस्वी ठरला नाही. पुणेरी बाप्पाच्या जलदगती गोलंदाज निकित धुमाळने सुरेख गोलंदाजी करत पहिल्याच चेंडूवर प्रीतम पाटील(१)ला झेल बाद केले. त्याचा झेल रामकृष्ण घोषने टिपला. त्यानंतर दुसर्याच चेंडूवर कर्णधार अझीम काझीला त्रिफळा बाद करून सामन्यातील वैयक्तिक दुसरा बळी टिपला. रत्नागिरी जेट्स संघ ३.५ षटकात २ बाद २० धावा अशा स्थितीत असताना पावसाचा व्यत्यय आला. पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा खेळ सुरु झाला व हा सामना प्रत्येकी ८ षटकांचा करण्यात आला. धीरज फटांगरे आक्रमक फटका मारताना १५ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर निखिल नाईकने आक्रमक खेळी करत १३ चेंडूत ३१ धावा काढून संघाचा डाव पुढे नेला. त्यात त्याने १ चौकार व ३ षटकार खेचले. निखिल नाईकला निकित धुमाळने झेल बाद केले. दिव्यांग हिंगणेकर(नाबाद ८), किरण चोरमले(नाबाद २) यांनी संघाला ८ षटकात ५ बाद ६९ धावा उभ्या करून दिल्या.
विजयासाठी आवश्यक ६९ धावांचे आव्हान ४एस पुणेरी बाप्पा संघाने ७ षटकात २बाद ७०धावा करून पूर्ण केले. सामन्यात यश नाहरने १२ चेंडूत २चौकारासह १८ धावा, तर मुर्तझा ट्रंकवालाने २० चेंडूत २ चौकार व २ षटकाराच्या मदतीने ३२ धावा केल्या. या सलामीच्या जोडीने २८ चेंडूत ४७धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. यश नाहर १८ धावांवर असताना जोरदार फटका मारताना विजय पावलेने त्याला झेल बाद केले. अझीम काझीने त्याचा सुंदर झेल टिपला. त्यानंतर मुर्तझा ट्रंकवाला आक्रमक फटका मारताना विजय पावलाच्या गोलंदाजीवर त्रिफळा बाद झाला. अखेर सूरज शिंदेने नाबाद ७, साहिल औताडेने नाबाद ६ यांनी संघाचा विजय सुकर केला. एमपीएलमध्ये आज, शनिवार ७ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता रत्नागिरी जेट्स विरुद्ध सातारा वॉरियर्स यांच्या पहिला सामना रंगणार आहे. तर, दुपारी २ वाजता पीबीजी कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स यांच्यात दुसरी लढत रंगणार आहे. सायंकाळी ७ वाजता रायगड रॉयल्स विरुद्ध ४ एस पुणेरी बाप्पा यांच्यात तिसरी लढत होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
रत्नागिरी जेट्स: ८षटकात ५बाद ६९धावा(निखिल नाईक ३१(१३,१ु४,३ु६), धीरज फटांगरे १५, निकित धुमाळ ३-१४, रोशन वाघसरे १-२४) वि.४एस पुणेरी बाप्पा: ७ षटकात २बाद ७०धावा(मुर्तझा ट्रंकवाला ३२(२०,२ु४,२ु६), यश नाहर १८(१२,२ु६), सूरज शिंदे नाबाद ७, साहिल औताडे नाबाद ६, विजय पावले २-११); सामनावीर - निकित धुमाळ.
Related
Articles
पुरी रथयात्रेदरम्यान ६०० हून अधिक भाविक आजारी
29 Jun 2025
स्वच्छतेचे महत्त्व ठसवणारा ‘अवकारीका’ चित्रपट १ ऑगस्टला पडद्यावर
02 Jul 2025
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
29 Jun 2025
उत्तराधिकार्याची निवड ट्रस्ट आणि तिबेटच्या परंपरेप्रमाणे
02 Jul 2025
टी-२० क्रिकेटमधील ’पॉवर प्ले’संदर्भात आयसीसीचा नवा नियम
28 Jun 2025
घरात घुसून तरूणीवर अत्याचार
04 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया