E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
रांजणगाव गणपती
, (वार्ताहर) : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती, ता. शिरुर येथील श्री महागणपतीच्या दर्शनासाठी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी गर्दी केली होती.’गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया’ चा जयघोष करत भाविकांनी महागणपतीचे मनोभावे दर्शन घेतले.
संकष्टी चतुर्थीनिमित्त पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात महिला भगिनींसह भाविक सहभागी झाले होते. भाविकांसाठी सुलभ जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद व पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या. शनिवारची सुट्टी आणि चतुर्थी यामुळे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने रांजणगाव अक्षरशः फुलून गेले होते.
दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्ट मुख्यविश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. येथील गणेशभक्त व प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर गाभार्यात व परिसरात विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. श्री महागणपती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ.ओमकार देव, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव डॉ.तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव,राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोर्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, देवस्थान कर्मचारी व भाविक उपस्थित होते. दरम्यान, चतुर्थीनिमित्त रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Related
Articles
राज्यातील १४७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेच्या ८० टक्क्यांहून अधिक प्रवेश
02 Jul 2025
ज्योतिष शास्त्रामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही : दाते
01 Jul 2025
ठाकरे बंधूंमधील संवाद बघून काही जण अस्वस्थ
01 Jul 2025
बागेश्वर धाममध्ये शेड कोसळून एकाचा मृत्यू, ८ जण जखमी
03 Jul 2025
नक्षलग्रस्त बस्तरपर्यंत आता रेल्वेचे जाळे
28 Jun 2025
वाचक लिहितात
27 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप