हिसार : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिचा जामीन अर्ज येथील न्यायालयाने बुधवारी फेटाळला, असे तिच्या वकिलांनी सांगितले. दंडाधिकारी (प्रथम वर्ग) सुनील कुमार यांच्यासमोर ज्योतीचा अर्ज सुनावणीसाठी होता. वकील कुमार मुकेश यांनी ज्योतीतर्फे अर्ज दाखल केला होता. या खटल्याचा तपास सुरू असल्याचा युक्तिवाद करताना पोलिसांनी जामीन अर्जाला विरोध केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. ९ जून रोजी न्यायालयाने ज्योतीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली होती. तसेच, पुढील सुनावणी २३ रोजी ठेवली आहे.
Fans
Followers