व्हॉट्सऍप कट्टा   

कोणी लिहिलं आहे माहीत नाही मात्र अगदी खरं आणि उत्तम लिहिलं आहे. जरूर वाचा.
१. ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ!
२. रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ !
३. एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ!
४. सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ! 
५. तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये  ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ.
६. प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ,
७. भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही  सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ ! 
८. सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकुन मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !
९. बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे काम करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ ! 
१०. दिसतो तो फक्त 
आऽऽ कर असं म्हटल्यावर, थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ !
--
एकत्र येणं सोपं असतं, पण एकत्र होणं कठीण असतं.
कारण एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही,
पण एकत्र होण्यासाठी विचार एकत्र येणं गरजेचं असतं.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही...
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही...
पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो...
 

Related Articles