E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
नगरसेवकांची संख्या आठने घटली
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
पुणे : लोकसंख्येची वाढ गृहीत धरुन २०२२ मध्ये प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या १७३ निश्चित करण्यात आली होती. नवीन प्रभाग रचनेच्या आदेशानुसार आता पुणे महापालिकेत २१ गावांचा समावेश होऊन सुध्दा केवळ १६५ नगरसेवकांची संख्या होणार आहे. २०१७ मध्ये नगरसेवकांची संख्या १६२ होती. यानंतर गावांचा समावेश झाल्यानंतर २ ने नगरसेवकांची संख्या वाढली. ३४ लाख लोकसंख्या गृहीत धरुन प्रभाग रचना केली जाणार आहे.
राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने नवीन प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्यातील सर्व महापालिकांना दिले आहेत. यामध्ये २०११ ची जनगणना गृहीत धरण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार मतदारांची संख्या ही सुमारे ४५ लाखांपर्यंत आहे. प्रभाग रचनेचे प्रारुप तयार केल्यानंतरच प्रभागांची संख्या समजू शकेल. शहरात अंदाजे ४२ प्रभाग असतील यापैकी ३९ प्रभाग हे चार सदस्यीय असतील, असा अंदाज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने चार सदस्यीय प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्यासाठी २० अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. तसेच यंदा जनगणनेच्या प्रगणक गटानुसार गुगल मॅप आणि गुगल अर्थचा वापर करून प्रभागांच्या सीमा अधिकाअधिक अचूक करण्यात येतील, अशी माहिती काटकर यांनी दिली.
देशात २०११ मध्ये शेवटची जणगणना झाली आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीमध्ये सहा हजार ४०० प्रगणक गट आहेत. हे गट न फोडता नगरविकास विभागाने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे, नाले, ओढे, नदी, डोंगर या नैसर्गिक सीमारेषांसोबतच मोठे रस्ते याच सीमारेषा ग्राह्य धरून गुगल मॅप आणि गुगल अर्थचा वापर करून प्रभागाच्या सीमारेषा निश्चित करण्यात येतील.
समाविष्ट गावांच्या प्रगणक गटांची यादी अद्याप उपलब्ध झालेली नाही, ती देखिल जिल्हा प्रशासनाकडून लवकरच मिळेल. पारदर्शकता राखण्यासाठी प्रगणक गटांची माहिती महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल, असे काटकर यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीने २०२२ मध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. प्रभाग रचनेमध्ये समाविष्ट ३४ गावांचा समावेश होता. यावेळी सरकारने ३१ लाख लोकसंख्येसाठी १६८ सदस्यसंख्या तर त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक सदस्य असा बेस निश्चित केला होता. त्यामुळे सदस्य संख्या १७३ झाली होती. महायुती सरकारने यामध्ये फेरबदल करताना चार सदस्यीय प्रभाग रचना केली. परंतु हे करत असताना ३० लाख लोकसंख्येसाठी १६० सदस्य संख्या व पुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक सदस्य असा बेस निश्चित केला. त्यामुळे सदस्य संख्या १६५ पर्यंत कमी झाली, अशी माहिती प्रसाद काटकर यांनी दिली.
Related
Articles
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
व्यापार चर्चेच्या चौकटीवर चीन-अमेरिकेची सहमती
12 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
व्यापार चर्चेच्या चौकटीवर चीन-अमेरिकेची सहमती
12 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
व्यापार चर्चेच्या चौकटीवर चीन-अमेरिकेची सहमती
12 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
व्यापार चर्चेच्या चौकटीवर चीन-अमेरिकेची सहमती
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !