फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...   

पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

नवी दिल्ली : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी ख्वाजा आसिफ यांनी आयपीएल फ्लडलाइट्स हॅक केल्याचा दावा केला आहे.पाकिस्तानी संसदेत बोलताना आसिफ यांनी दावा केला की त्यांच्या देशातील ’सायबर वॉरियर्स’नी भारतात आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडियमचे दिवे बंद केले होते. ख्वाजा आसिफ यांनी कदाचित ८ मे रोजी धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल विधान केले असेल, जो परिसरातील तांत्रिक बिघाडामुळे मध्यंतरी रद्द करण्यात आला होता.
 
पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्यंतरी थांबवण्याचा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आला. खरे तर, भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला, त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
 
आसिफने दावा केला की, ’भारताला हे समजत नाही की हे सर्व पूर्णपणे पाकिस्तानचे स्वदेशी तंत्रज्ञान आहे. आमच्या सायबर योद्ध्यांनी भारतावर हल्ला केला आणि क्रिकेट स्टेडियममधील दिवे बंद केले. दिवे बंद पडल्यामुळे सामना थांबवावा लागला. भारतीय धरणांमधून पाणी सोडण्यात आले, त्यांचे पॉवर ग्रिड बंद करण्यात आले.’’हे सर्व हल्ले, सायबर हल्ले आमच्या योद्ध्यांनी केले आहेत.’ आसिफचा हा २९ सेकंदांचा क्लिप सोशल मीडियावर वार्‍यासारखा पसरला आहे. आसिफला ऑनलाइन खूप ट्रोल करण्यात आले. वापरकर्त्यांनी पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांना फटकारले आणि त्यांची खूप खिल्लीही उडवली.
 
आसिफला ऑनलाइन ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑपरेशन सिंदूरच्या काही दिवसांनंतर, आसिफला पाकिस्तानच्या हवाई दलाने पाच भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा सिद्ध करण्यास सांगितले गेले. अँकरने पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांना विचारले, पुरावा कुठे आहे? - ज्यावर त्यांनी आत्मविश्वासाने उत्तर दिले: हे सर्व सोशल मीडियावर आहे.

Related Articles