दिल्लीचा सहज विजय   

जयपूर : दिल्ली कॅपिटल्सचा संघ विरुद्ध पंजाब किंग्जचा संघ यांच्यात शनिवारी रंगलेल्या आयपीएलच्या 66 व्या सामन्यात दिल्लीच्या संघाने शानदार गोलंदाजी आणि फलंदाजी करत हा सामना 6 फलंदाज राखून जिंकला.

 या सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी सार्थ ठरविला. दिल्लीच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. यावेळी मुस्तफिझुर रेहमान याने 3 बळी तर विपराज निगम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले. मुकेश कुमारला 1 बळी मिळाला.

मात्र तरीही पंजाबच्या संघाने 20 षटकांत 206 धावा केल्या. यावेळी 8 फलंदाज बाद झाले. त्यामुळे दिल्लीच्या संघाला 207 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने 19.3 षटकांत 208 धावा केल्या. यावेळी 4 फलंदाज बाद झाले आणि दिल्लीच्या संघाने सामन्यावर वर्चस्व मिळविले.

दिल्लीच्या फलंदाजांपैकी सलामीवीर के.एल.राहूल याने 21 चेंडूत 35 धावा केल्या. त्याला मॅक्रो जॅक्सन याने शानदार गोलंदाजी करत शशांक सिंगकडे त्याला झेलबाद केले. प्लेसीस याने 23 धावा केल्या. हरप्रित बार याने शानदार गोलंदाजी करत प्रियांश आर्याकडे त्याला झेलबाद केले. करूण नायर याला 44 धावांवर असताना हरप्रितबार याने त्याचा त्रिफळा उडविला.

सेद्दीकुल्ला अटल याने 22 धावा केल्या. प्रविण दुबे याने शानदार गोलंदाजी करत अर्शदीप सिंगकडे त्याला झेलबाद केले. समीर रिझवी 58 धावांवर नाबाद राहिला. तर त्रिशान स्ट्ब्ज याने नाबाद 18 धावा केल्या. आणि दिल्लीला सामना जिंकवून दिला. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाकडून फलंदाजी करताना सलामीवीर प्रियांश आर्या हा अवघ्या 6 धावांवर बाद झाला. त्याला मुस्तफिझूर रेहमान याने स्ट्ब्ज याच्याकडे झेलबाद केले. तर दुसर्‍या क्रमांकावर आलेला प्रभासिमरन याने 28 धावा केल्या. विपराज निगम याने त्याचा त्रिफळा उडविला.

 श्रेयश अय्यर याने 53 धावा करत अर्धशतक साकारले. कुलदीप यादव याने शानदार गोलंदाजी करत मोहीत शर्माकडे त्याला झेलबाद केले. जोश इंग्लिश याने 32 धावा केल्या. विपराज निगम याने स्ट्ब्ज याच्याकडे त्यला झेलबाद केले. त्यानंतर नेहल वाढेरा याने 16 धावा केल्या. मुकेशकुमार याने प्लेसीसकडे त्याला झेलबाद केले. शशांक सिंग याने 11 धावा केल्या. मुस्तफिझुर रेहमान याने त्याला चकविणारा चेंडू टाकत स्ट्ब्जअकडे झेलबाद केले. स्टॉयनिस याने नाबाद 44 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली ़कॅपिटल्स : लोकेश राहुल 35, प्लेसीस 23, करूण नायर 44, सेद्दीकुल्ला अटल 22, समीर रिझवी नाबाद 58, स्ट्ब्ज 18, एकूण 19.3 षटकांत 208/4

पंजाब किंग्ज : प्रियांश आर्या 6, प्रभासिमरन 28, श्रेयर अय्यर 53, जोश इंग्लिश 32, नेहल वाढेरा 16, शशांकसिंग 11, स्टोनिस 44, हरप्रित बार 7, अझमतुल्ला 1,एकूण 20 षटकांत 206/8

 

Related Articles