E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
‘ईडी’ने सर्व मर्यादा ओलांडल्या
Samruddhi Dhayagude
23 May 2025
सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय सर्व मर्यादा ओलांडतानाच संघराज्य रचनेचे उल्लंघन करत आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी ईडीला फटकारले.यासोबतच, तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाविरुद्धच्या (टीएसएमसी) ईडी चौकशीला न्यायालयाने स्थगिती दिली. तामिळनाडू सरकार आणि तामिळनाडू राज्य विपणन महामंडळ (टीएसएमसी) यांनी दाखल केलेल्या अर्जावरुन ईडीला नोटीस बजावतानाच १५ दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगितले.
सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठासमोर याबाबतचा अर्ज सुनावणीस आहे. ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी तर द्रमुक सरकारतर्फे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अमित आनंद तिवारी बाजू मांडत आहेत. तामिळनाडूत १ हजार कोटींचा मद्य गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप ईडीने केला आहे.
दरम्यान, तामिळनाडू सरकारने २०१४ ते २०२१ या कालावधीत टीएसएमसीच्या अधिकारी आणि कर्मचार्यांविरुद्ध ४१ गुन्हे दाखल केले आहेत. राज्य सरकार मद्य विक्री परवाने देण्यातील अनियमिततेसह इतर आरोपांची चौकशी करत आहेत. अशा परिस्थितीत ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला, असे सांगितले.
यावर सरन्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केले. तुम्ही एखाद्या व्यक्तीविरोधात खटला दाखल करत होतात. पण, आता थेट महामंडळावरच कारवाई? असा सवाल करतानाच ईडीने आता खरोखरच सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे, असे निरीक्षण नोंदविले. जेव्हा राज्य सरकार चौकशी करत आहे, तेव्हा अशा हस्तक्षेपाची काय गरज होती?’ असा सवालही सरन्यायाधीशांनी केला.
तामिळनाडूत द्रमुकचे सरकार आहे. द्रमुक सरकार आणि मद्य विक्रीचा संपूर्ण कार्यभार सांभाळणार्या तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाने ईडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Related
Articles
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
अतिवृष्टीबाधित शेतकर्यांना दोन हेक्टरपर्यंतच मदत
03 Jun 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
अतिवृष्टीबाधित शेतकर्यांना दोन हेक्टरपर्यंतच मदत
03 Jun 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
अतिवृष्टीबाधित शेतकर्यांना दोन हेक्टरपर्यंतच मदत
03 Jun 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
अतिवृष्टीबाधित शेतकर्यांना दोन हेक्टरपर्यंतच मदत
03 Jun 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी