मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू   

दोन मोठ्या दगडांमध्ये अडकली होती

मांडला : मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानातील एका टेकडीवरील दोन मोठ्या दगडांत अडकून एका वाघिणीचा दुदैवी मृत्यू झाला आहे.वाघीण आठ ते दहा वर्षांची होती. मंगळवारी तिचा मृतदेह मुंडी दादर भागात सापडला असल्याची माहिती वन अधिकारी रवींद्र त्रिपाठी यांनी दिली. टेकडीवरील दोन मोठ्या दगडात ती अडकली होती. श्वान पथकांच्या माध्यमातून वन कर्मचार्‍यांनी परिसर तपासासाठी पिंजून काढला होता. वाघिणीच्या मृतदेहाचे भाग काळजीपूर्वक बाहेर काढले असून ते  पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दरम्यान, राज्यातील कान्हा, बांधवगढ, पेंच, सातपुडा आणि पन्ना व्याघ्र प्रकल्पात वाघांचे संवर्धन केले जाते. 
 

Related Articles