मणिपूरमध्ये सहा दहशतवाद्यांना अटक   

इंफाळ : मणिपूरमधील विविध प्रतिबंधित संघटनांशी संबंधित सहा दहशतवाद्यांना सुरक्षा दलाकडून अटक करण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले.
 
पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या तीन सदस्यांना काकचिंग जिल्ह्यातील एलांगखांगपोकपी आणि काकचिंग निंगथौ पैरेन भागातून अटक करण्यात आली. तर, अन्य तिघांमध्ये कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीचा (तैबांगनबा) एक सक्रिय सदस्य, केसीपी (अपुनबा) गटाचा सदस्य आणि केसीपी-पीएससी (पोलिटब्युरो स्टँडिंग कमिटी) च्या एका सदस्याचा समावेश आहे.  सोमवारी आणि मंगळवारी पोलिस, लष्कर आणि निम लष्करी दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या ताब्यातून पिस्तूल, रायफल, बॉम्बसह अनेक शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे, असे अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

Related Articles