पॉलिसीच्या नावाखाली ९९ हजारांची फसवणूक   

पिंपरी : पॉलिसी काढणार्या एजंटच्या विरोधात तक्रार देण्यासाठी ९९ हजार भरण्यास सांगून एका नागरिकाची फसवणूक केली. ही घटना सोमवारी दुपारी पिंपरीतील डॉ. वाय. पाटील हॉस्पिटलजवळ घडली. पियुष सोमाणी, राजीव कपूर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रत्नागिरी येथे राहणार्या ५९ वर्षीय व्यक्तीने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी रुग्णालयात दाखल असल्याने ते तिला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना फोनवरून पियुष सोमाणी याने संपर्क साधून तुमच्या पॉलिसीची मुदत संपली आहे. तुमचे पैसे एजंटच्या खात्यावर जमा होणार आहे. त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी ९९ हजार भरावे लागतील असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने राजीव कपूरच्या बंधन बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगत फसवणूक करण्यात आली. संत तुकारामनगर पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles