E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
Vikrant kulkarni
02 Jun 2025
अहमदाबाद : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रविवारी झालेल्या आयपीएलच्या उपांत्य फेरीच्या दुसर्या सामन्याआधी पावसाने उपस्थिती लावल्यामुळे सामना खोळंबला. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. त्यानंतर हा सामना तब्बल २ तास उशीरा सुरु करण्यात आला. आणि २० षटकांचाच सामना खेळविण्यात आला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. आणि २० षटकांत २०३ धावा केल्या. यावेळी ६ फलंदाज बाद झाले. पावसानंतर मुंबईचे फलंदाज चमकले. मुंबईकडून फलंदाजी करताना रोहीत शर्मा ८ धावांवर बाद झाला. त्याला स्टॉयनिस याने विजयकुमार याच्याकडे झेलबाद केले.
जॉनी बेरेस्टो ३८ धावा करून तंबूत माघारी परतला. त्याला विजयकुमार याने जोश इंग्लिशकडे झेलबाद केले. तिलक वर्मा आणि सुर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी ४४ धावा केल्या. तिलक वर्मा याला जेमीसन याने शानदार गोलंदाजी करत प्रियांश आर्याकडे झेलबाद केले.सुर्यकुमार यादव याला चहल याने ४४ धावांवर असताना नेहल वाढेरा याच्याकडे झेलबाद केले. हार्दिक पांड्या याने १५ धावा केल्या. अझमतुल्ला याने शानदार गोलंदाजी करत जोश इंग्लिशकडे झेलबाद केले.नमन धीर याने ३७ धावा केल्या. अझमतुल्ला याने त्याला स्टॉयनिसकडे झेलबाद केले. त्यानंतर राज बावा ८ धावांवर नाबाद राहिला आणि मिचेल सॅटनर शून्यावर नाबाद राहिला. ९ अवांतर धावा मुंबईच्या संघाला मिळाल्या.
पंजाबच्या गोलंदाजांपैकी अझमतुल्ला ओमारझी याने २ बळी घेतले तर कायल जेमीसन, स्टॉयनिस, विजयकुमार आणि चहल यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला.या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध अंतिम सामना खेळेल. हार्दिक पांड्याच्या मुंबईच्या संघाचा या मैदानावर खूपच खराब विक्रम आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबईने या मैदानावर एकही सामना जिंकलेला नाही. या तीन वर्षांत मुंबईने या मैदानावर चार सामने खेळले आहेत.
मुंबई संघाने गुजरात टायटन्सविरुद्ध चारही सामने खेळले आहेत आणि या चारही सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.हे स्टेडियम पंजाब किंग्जसाठी विजय आणि पराभव दोन्ही देत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या गेल्या ५ सामन्यांपैकी ३ सामन्यांमध्ये पंजाबने विजय मिळवला आहे आणि संघाने २ सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. चंदीगडमध्ये बंगळुरुविरुद्ध झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभव पत्करल्याने पंजाब संघ दुसर्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचला.
Related
Articles
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !