अणुयुद्ध रोखल्याचे श्रेय मिळाले नाही डोनाल्ड ट्रम्प यांची खंत   

वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तानातील युद्ध रोखण्यात मोठी भूमिका बजावली; पण त्याचे श्रेय मिळाले नाही, अशी खंत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली.एका मुलाखतीत बोलताना ट्रम्प म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला होता. दोन्ही देशांमधील तणाव इतका वाढला होता की ते अणुयुद्धाच्या अगदी जवळ पोहोचले होते. दोन्ही देशातील अणुयुद्ध रोखण्यात मी मोठी भूमिका बजावली. भारत-पाकिस्तान युद्ध रोखणे हे मोठे यश आहे. तथापि, मला त्याचे श्रेय मिळाले नाही.
 
दरम्यान, युद्ध थांबवण्याच्या बदल्यात मी दोन्ही देशांसोबत व्यापार करण्याचा प्रस्ताव दिला होता. आता मी हिशेब चुकता करण्यासाठी आणि दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी व्यवसायाचा वापर करत आहे.

Related Articles