नवी दिल्ली: अरूण जेटली क्रिकेट मैदानावर रविवारी झालेल्या आयपीएलच्या 60 व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने एकही बळी न गमावता यजमान दिल्ली कॅपिटल्सच्या संघावर तब्बल 10 फलंदाज राखून विजय मिळविला. या विजयासह गुजरातचा संघ अव्वल क्रमांकावर आला आहे. दिल्लीच्या संघाला घरच्या मैदानावर गुजरातच्या संघाने नमवत प्लेऑफ्सचे तिकीट पक्के केले. गुजरात संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीने जबरदस्त कामगिरी केली.
साई सुदर्शन याने 61 चेंडूत 108 धावा केल्या. आणि नाबाद शतक केले. तर शुभमन गिल याने नाबाद 93 धावा केल्या आणि सामना गुजरातच्या नावावर केला. तसेच अवांतर 4 धावा संघाला मिळाल्या.त्याआधी मात्र दिल्लीच्या संघाने 20 षटकांत 199 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून खेळताना के.एल.राहुल याने 65 चेंडूत 112 धावा केल्या. आणि दिल्लीच्या संघासाठी शतक केले. त्यानंतर प्लेसीसने 5 धावा केल्या. मात्र त्याला अर्शद खान याने शानदार गोलंदाजी करत सिराजकडे झेलबाद केले.
अभिषेक पोरेल याने 30 धावा केल्या. अक्सर पटेल हा 25 धावांवर बाद झाला. स्ट्ब्जला नाबाद 21 धावा करता आल्या. तर अवांतर 6 धावा दिल्लीच्या संघाला मिळाल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी गुजरातचे फलंदाज बाद करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले. त्यांना एकही फलंदाज बाद करता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स : साई सुदर्शन नाबाद 108, शुभमन गिल नाबाद 93, अवांतर 4 एकूण 19 षटकांत 205/0
दिल्ली कॅपिटल्स : के.एल राहुल 112, प्लेसीस 5, अभिषेक पोरेल 30, अक्सर पटेल 25, स्ट्ब्ज नाबाद 21 अवांतर 6 एकूण 20 षटकांत 199/3
Fans
Followers