E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
’मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या अनुदानात वाढ करणार : उपमुख्यमंत्री पवार
Wrutuja pandharpure
18 May 2025
पुणे
: मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सागितले. आगामी खरीप हंगामात शेतकर्यांना बी-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपलब्धतेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, माऊली कटके, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.
जिल्ह्याने अॅग्री हॅकॅथॉनल नाविन्य पूर्ण उपक्रम राबविला आहे. ज्याची नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकर्यापर्यंत पोहोचविण्यासाठी उपयोग होईल. शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अंदाजपत्रकात ५०० कोटींची तरतूद केली आहे. शेतकर्यांनी प्रत्यक्ष त्याचा वापर करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना त्यांचे फायदे लक्षात आल्यानंतर अधिक मागणी होईल. ते पाहता विविध पिकांसाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा, म्हणून अधिकची तरतूद करण्यात येईल, असेही पवार म्हणाले.
राज्यात पूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेत ५० हजार रुपये अनुदान दिले जात होते. ते वाढवून ७५ हजार रुपये केले. आता त्यात वाढ करण्याची मागणी होत असून १ लाखांपर्यंत कसे वाढविता येईल, याबाबत विचार विनिमय केला जाईल, असे सांगून पवार म्हणाले बियाणे, किटकनाशकांच्या बाबतीत तक्रारीकडे तात्काळ लक्ष द्यावे. बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नयेत, यासाठी कठोर कारवाई करावी. डोंगरी भागात कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तेथील पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी. कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभांची रक्कम महाडीबीटी मार्फत वेळेत शेतकर्यांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न करावेत.
जिल्हाधिकारी डुडी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या ३ हंगामात सुमारे ३४ हजार क्विंटल बियाणांची विक्री झाली असून, यावर्षी ४८ हजार क्विंटल बियाणे पुरवठ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. १ लाख ९६ हजार मेट्रिक टन रासायनिक खतसाठा मंजूर आहे. त्यानुसार पुरवठ्याबाबत अडचण येणार नाही. युरीयाचा ७ हजार ५०० मेट्रिक टन आणि डीएमीच्या १ हजार मेट्रिक टनाचा बफर साठा करण्यात येणार आहे. प्रारंभी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त लाभार्थी शेतकर्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले
Related
Articles
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
31 May 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
वडगावशेरीत गुटखा, तंबाखू, सिगारेटची होळी
01 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
31 May 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
वडगावशेरीत गुटखा, तंबाखू, सिगारेटची होळी
01 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
31 May 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
वडगावशेरीत गुटखा, तंबाखू, सिगारेटची होळी
01 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
31 May 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
वडगावशेरीत गुटखा, तंबाखू, सिगारेटची होळी
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी