E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणे स्फोटक प्रकरणातील ईसीसच्या दोन हस्तकांना अटक
Samruddhi Dhayagude
18 May 2025
मुंबईमध्ये एनआयएची कारवाई
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आयसीसच्या दोन हस्तकांना मुंबई विमानतळावर अटक केली. अब्दुर्लंला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान, अशी त्यांची आहेत. पुण्यात शक्तिशाली स्फोटकाचे निर्माण आणि त्याची चाचणी घेतल्याप्रकरणी २०२३ पाासून पोलिसांना हवे होते. त्यांना पकडून देणार्यास ३ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
एनआयएच्या सुत्रांनी सांगितले की, इंडोनेशियाची राजधानी जकार्ता ते
मुंबई असा विमान प्रवास करुन ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. पारपत्र विभागाने त्यांना रोखले. यानंतर एनआयएचे पथक कार्यरत झाले. त्यांना ताब्यात घेऊन नंतर अटक केली. गेल्या दोन वर्षांपासून ते तपास आणि पोलिस यंत्रणांना गुंगारा देत होते. मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट काढले होेते. तसेच त्यांची माहिती देणार्यांस ३ लाख रुपयांचे बक्षिसही जाहीर केले होते. त्यांच्यासह पुण्यातील आयसीसच्या आठ हस्तकांवर गुन्हेगारी कारस्थान रचल्याचे खटले दाखल आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले.
सर्व जणांनी कारस्थान रचून दहशतवादी कारवाया करुन देशाच्या शांततेला आणि सौहार्दाला नख लावले तसेच देशाविरोधात आणि सरकारविरोधात युद्ध पुकारले .त्या माध्यमातून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरयाचे (ईसीस) देशात इस्लामिक राजवट आणण्याचे ते स्वप्न पाहात होते. त्यासाठी देशात हिंसाचार आणि दहशतवाद पसरविण्याचे त्यांचे उद्योग सुरू होते, अशी माहिती एनाआयएच्या अधिकार्यांनी दिली.
पकडण्यात आलेले दोन हस्तक पुण्यातील कोंढवा येथील अब्दुल फैयाज शेख यांनी दिलेल्या भाड्याच्या घरात राहात होते.शक्तिशाली स्फोटक तयार केल्याप्रकरणी त्यांच्यासह अन्य जणांवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. २०२२ ते २०२३ दरम्यान त्यांनी संघटितपणे बाँब तयार करणे आणि प्रशिक्षण कार्यशाळा देखील चालविली होती. तसेच शक्तिशाली स्फोटकाची चाचणी देखील घेतली होती.
आयसीस
च्या देशातील हिंसक आणि देशविरोधी कारवायांचा तपास एनआयएकडून सुरू आहे. यापूर्वी बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा आणि स्फोटकासंदभांतील कायदा आणि शस्त्र कायदा आणि दंडसंहितेचे उल्लंघन प्रकरणातील विविध कलमांतर्गत दहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, अब्दुल्ला फैयाज शेख आणि ताल्हा खान यांना अटक करण्यापूर्वी या प्रकरणी महमद इम्रान खान, महमद युनूस साकी, अब्दुल्ला कादीर पठाण, सीमाब नसरद्दीन काझी, झुल्फिकार अली बरोदवाला, शमील नाचन, अकिफ नाचन आणि शहानवाज आलम यांना अटक केली होती.
Related
Articles
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई
30 May 2025
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई
30 May 2025
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई
30 May 2025
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई
30 May 2025
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात