गाय चक्क तिसर्‍या मजल्यावर!   

पुणे : भटक्या श्वानांनी केलेल्या पाठलागामुळे घाबरलेली गाय एका वाड्याच्या तिसर्‍या मजल्यावर चढल्याची घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास रविवार पेठेमध्ये घडली.यावेळी स्थानिक नागरिकांनी या गाईला खाली आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाय खाली येत नसल्यामुळे नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर, जवानांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने तिला खाली उतरवले.
 
रविवार पेठेमध्ये काल सकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावरुन जाणार्‍या  गाईवरभटक्या श्वानांनी भुंकण्यास सुरूवात केली. त्यामुळे ती घाबरली आणि तेथून पळण्यास सुरूवात केली.  ती दरवाजा उघड्या असलेल्या एका वाड्यात शिरली आणि लाकडी जिन्यावरून ती थेट तिसर्‍या मजल्यापर्यंत पोहोचली.दरम्यान, नागरिकांनी या गाईलाी जिन्यातून खाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र ती येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाशी संपर्क साचधला. दलाच्या जवानांनी गाईला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, ती खाली येत नसल्याचे लक्षात येताच, दलाने क्रेन आणि सेफ्टी बेल्टच्या साहाय्याने या गाईला खाली उतरवले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिली.

Related Articles