E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
Samruddhi Dhayagude
03 Jun 2025
अहमदाबाद : आयपीएल २०२५ चा रोमांच शिगेला पोहोचला आहे. या हंगामातील विजेतेपदाचा सामना आज मंगळवारी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या सामन्यात कोणताही संघ जिंकला तरी, आयपीएल चाहत्यांना एक नवीन विजेता संघ मिळणार हे निश्चित आहे.
पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन आयपीएल संघ आहेत, ज्यांनी आतापर्यंत एकही आयपीएल जेतेपद जिंकलेले नाही. दोन्ही संघ त्यांच्या पहिल्या जेतेपदाची वाट पाहत आहेत. पंजाबचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे, तर आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. विशेष म्हणजे, दोन्ही कर्णधार सात महिन्यांच्या आत झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा एकमेकांसमोर येत आहेत. यापूर्वी, दोन्ही कर्णधारांमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४च्या अंतिम फेरीत सामना झाला होता.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान हे दोन दिग्गज कर्णधार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने पाटीदारच्या संघाला पराभवाची चव चाखवली होती. आता इतिहास पुन्हा समोर उभा ठाकतोय, आणि रजत पाटीदारच्या मनात अय्यरची तीच धास्ती डोकं वर काढतेय. आयपीएल फायनलमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार, की रजत पाटीदार रिव्हेंज घेणार हा मोठा प्रश्न आहे.
आयपीएलच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट आहे, जर या सामन्यात पाऊस पडलाच आणि सामना रद्द झाला तर त्यासाठी आणखी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र राखीव दिवशीही पाऊस पडला तर मात्र पंजाब किंग्जचा संघ यावर्षीचा चॅम्पियन होणार आहे. कारण पंजाब किंग्जची टीम पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे, आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यास जी टीम पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असते तिला विजेता घोषित केलं जातं. त्यामुळे राखीव दिवशी जर पाऊस झाला तर याचा मोठा फटका हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला बसू शकतो आणि आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचं त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहू शकतं, त्यामुळे असं काही घडू नये अशीच प्रार्थना सध्या हा संघ करत असणार.
आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार्या सामन्यावर पावसाचे सावट आहे, त्यामुळे हा सामना थोडा उशिरा सुरू होऊ शकतो. अहमदाबादमध्ये हा सामना होणार आहे, रिपोर्टनुसार सायंकाळी ६ वाजता इथे पाऊस पडण्याची शक्यता ५१ टक्के एवढी वर्तवण्यात आलेली आहे. दरम्यान पंजाबचा संघ सध्या चांगला फॉर्ममध्ये आहे.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
बारामती नगरपालिकेची अतिक्रमणांवर कारवाई
11 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
बारामती नगरपालिकेची अतिक्रमणांवर कारवाई
11 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
बारामती नगरपालिकेची अतिक्रमणांवर कारवाई
11 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
बारामती नगरपालिकेची अतिक्रमणांवर कारवाई
11 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक