वरातीत तलवार घेऊन नृत्य; ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा   

मुंबई : लग्नाच्या वरातीत तलवार घेऊन नृत्य केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह अनिल गोरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 
 
सिद्धार्थ खरात हे मतदारसंघातील एका कार्यकर्त्याच्या लग्नासाठी गेले होते. लग्नाच्या वरातीवेळी खरात आणि गोरे यांनी हातात तलवारी घेऊन नृत्य केले. याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला. सार्वजनिक ठिकाणी तलवारी नाचविल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
दरम्यान, खरात यांनी यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, एका कार्यकर्त्याच्या लग्नासाठी गेलो होतो. त्यावेळी नवरदेवाच्या हाती असलेली प्रतिकात्मक तलवार घेऊन थोडा आनंद व्यक्त केला. ती खरी तलवार नव्हती. 
 

Related Articles