E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह
Wrutuja pandharpure
30 May 2025
पुणे
: महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन दि. १ ते ६ जून या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ जून रोजी महावितरण कंपनीचा २० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान मॅरेथॉन, फेरी, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना सुरक्षाविषयक ई-मेल व एसएमएस पाठविणे, भित्तीपत्रके, चित्रफिती अशा विविध माध्यमांव्दारे विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.
मागील काही वर्षामध्ये वीज अपघाताचे प्रमाण कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. मात्र तरीही विविध कारणास्तव अपघात होतात. विद्युत अपघाताचे प्रमाण अजून कमी करण्यासाठी महावितरणने विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करून व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे.
आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार हे ब्रिद घेऊन महावितरणच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात १ ते ६ जून दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. १ जून रोजी सर्व परिमंडळ कार्यालयाच्या मुख्यालयाच्या शहरात मॅरेथॉन ‘रन फॉर सेफ्टी’ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, ग्राहक व जनमित्र यांचेसाठी विद्युत सुरक्षा प्रश्नमंजुषा जाहीर करण्यात आली आहे. या प्रश्नमंजुषेत सहभागी होणार्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
२ जून रोजी राज्यातील ६५० उपविभाग अंतर्गत शहर व ग्रामीण भागातील रहिवासी परिसरात विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात येईल. ग्राहकांना विद्युत सुरक्षा विषयी ई-मेल पाठविणे. बाजार व इतर सार्वजनिक ठिकाणी विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती, ३ व ४ जून रोजी कर्मचार्यांच्या पाल्यांसाठी आणि कुटूंबियांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा विषयी निबंध, चित्रकला स्पर्धा, महावितरण कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी विद्युत सुरक्षा विषयी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
५ जून वसुंधरा दिनी १५० विभागीय स्तरावर विद्युत सुरक्षा व वीज बचत विषयी फेरी काढण्यात येणार आहे. ६ जून रोजी सकाळी १० ते १०.१५ या वेळेत राज्यातील सर्व शाखा कार्यालयातील जनमित्र यांच्यासाठी विद्युत सुरक्षा प्रतिज्ञा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
Related
Articles
२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव
15 Jun 2025
श्रद्धा, अंधश्रद्धा, भास आणि भीतीचा लपंडाव
11 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
दिल्लीत इमारतीला आग; तिघांचा मृत्यू
11 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव
15 Jun 2025
श्रद्धा, अंधश्रद्धा, भास आणि भीतीचा लपंडाव
11 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
दिल्लीत इमारतीला आग; तिघांचा मृत्यू
11 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव
15 Jun 2025
श्रद्धा, अंधश्रद्धा, भास आणि भीतीचा लपंडाव
11 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
दिल्लीत इमारतीला आग; तिघांचा मृत्यू
11 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव
15 Jun 2025
श्रद्धा, अंधश्रद्धा, भास आणि भीतीचा लपंडाव
11 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
दिल्लीत इमारतीला आग; तिघांचा मृत्यू
11 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक