E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भारतीय सैन्याच्या ताफ्यात नवीन ’भार्गवास्त्र’ दाखल
Samruddhi Dhayagude
15 May 2025
ड्रोनच्या हल्ल्यांचा होणारा धोका रोखण्यात पार पाडणार महत्त्वाची भूमिका
नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी भारताने ’ऑपरेशन सिंदूर’ करत पाकिस्तानातील दहशतवादी तळे नष्ट केली. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले केले. मात्र, भारतीय सैन्याने हे हल्ले परतवून लावले. या संघर्षादरम्यान अवघ्या जगाने भारताची क्षेपणास्त्र ताकद पाहिली. आता भारताची हीच ताकद आणखी मजबूत करण्यासाठी सैन्याच्या ताफ्यात ’भार्गवास्त्र’दाखल झाले आहे.
हवाई हल्ल्यांच्यावेळी ड्रोनच्या हल्ल्यांचा होणारा धोका रोखण्यासाठी भारताकडे आता एक नवीन आणि कमी खर्चिक शस्त्र आले आहे. ’भार्गवास्त्र’ नावाची ही हार्ड किल मोड काउंटर ड्रोन प्राणाली ’सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड एसडीएएल’ने तयार केली आहे. त्याची पहिली चाचणी बुधवारी यशस्वीरित्या पार पडली आहे. ओडिशाच्या गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये याची चाचणी घेण्यात आली. ’भार्गवास्त्र’ ही प्रणाली सूक्ष्म रॉकेटद्वारे ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. ड्रोनच्या धोक्यांना रोखण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
पहिली चाचणी यशस्वी!
’भार्गवास्त्र’ प्रणालीच्या मायक्रो रॉकेट्सची चाचणी १३ मे रोजी ओडिशातील गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये करण्यात आली. यावेळी भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. याच्या एकूण तीन चाचण्या घेण्यात आल्या. दोन चाचण्यांमध्ये, प्रत्येकी एक रॉकेट सोडण्यात आले, तर एका चाचणीत फक्त दोन सेकंदांच्या फरकाने सॅल्व्हो मोडमध्ये दोन रॉकेट सोडण्यात आले. चारही रॉकेट अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत असून त्याने सर्व चाचणी मापदंड पूर्ण केले आहेत.
’भार्गवास्त्र’च्या नावही खास
’भार्गवास्त्र’च्या नावही खास आहे. महाभारतात काही विध्वंसक अस्त्र वापरले गेले होते. यापैकी एक भार्गवास्त्र देखील होते. ज्याचे नाव महर्षी भार्गव परशुराम यांच्या नावावरुन ठेवण्यात आले होते. आता या नावापासून प्रेरणा घेऊन, भारताने एक अत्याधुनिक सूक्ष्म-क्षेपणास्त्र आधारित काउंटर-ड्रोन प्रणाली विकसित केली आहे. भारताच्या ताफ्यात सामील झालेले हे नवीन ’भार्गवास्त्र’ आधुनिक युद्धात देशाच्या सुरक्षेला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे.
’भार्गवस्त्रा’ची खासियत काय?
’भार्गवास्त्र’ हे मानवरहित हवाई वाहन असून, धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. यात द्वि-स्तरीय मारक यंत्रणा आहे. याच्या पहिल्या थरात दिशाहीन मायक्रो रॉकेट्स तैनात केले आहेत. जे २० मीटरच्या अंतरातील ड्रोनच्या ताफ्याला उद्ध्वस्त करण्यात सक्षम आहे. याचा मारक पल्ला २.५ किमीपर्यंत आहे. तर, दुसर्या थरामध्ये अचूक लक्ष्य साधणारे मार्गदर्शित सूक्ष्म क्षेपणास्त्र आहे. एसडीएएलने विकसित केलेली ही प्रणाली मॉड्यूलर आणि भू-प्रदेशाशी जुळवून घेणारी असून, पाच हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात देखील ही कार्य करण्यास सक्षम आहे. यामुळे ती भारतीय सशस्त्र दलांच्या मोहिमांमध्ये मोठी भूमिका बजावू शकते. ’भार्गवास्त्र’चे रडार ६ ते १० किमी अंतरावरील लो रडार क्रॉस-सेक्शनमध्ये हवाई लक्ष्ये शोधू शकते.
Related
Articles
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
06 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
06 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
06 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
06 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?