E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तुर्की, अझरबैजानला आपण पर्यटनाच्या माध्यमातून ४,००० कोटी दिले
Samruddhi Dhayagude
14 May 2025
हर्ष गोयंकांची जळजळीत पोस्ट
भारतीय उद्योगपती, अब्जाधीश हर्ष गोयंका हे सामाजिक, राजकीय विषयांवर बेधडक भाष्य करत असतात. हर्ष गोयंका यांची एक्सवर केलेली पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सध्या त्यांनी तुर्किये आणि अझरबैजान या दोन देशांवर भारतीय पर्यटकांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले असता उभय देशांनी पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला होता. त्यावरून गोयंका यांनी संताप व्यक्त केला आहे.
हर्ष गोयंका यांनी म्हटले की, भारतीय पर्यटकांनी मागच्या वर्षी तुर्किये आणि अझरबैजान या दोन देशांना पर्यटनाच्या माध्यमातून ४,००० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय मिळवून दिला. यानंतर ते म्हणाले की, भारतीय पर्यटकांनी आता आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. आपल्या शत्रूला मदत करणाऱ्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था बळकट होईल, असे कोणतेही कृत्य यापुढे आपल्याला करायचे नाही.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये गोयंका म्हणतात, “भारतीय नागरिकांनी मागच्या वर्षभरात पर्यटनाच्या माध्यमातून तुर्की आणि अझरबैजानला ४,००० कोटींहून अधिकचा व्यवसाय मिळवून दिला. यातून त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, रोजगार वाढले, हॉटेल्स, विमाने जोरदार चालली. आज हे दोन्ही देश पाकिस्तानच्या बाजूने उभे आहेत. भारत आणि जगभरातही खूप सुंदर पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे कृपया या दोन देशांत जाणे टाळा. जय हिंद”
तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्काराची मागणी
भारतातील बरेच पर्यटन कंपन्यांनी आता या दोन्ही देशांवर बहिष्कार घालण्याची भाषा केली आहे. तुर्किये आणि अझरबैजान देशातील बरीच आरक्षणे रद्द करण्यात आली. तुर्कीचे पॅकेजेस उपलब्ध नसल्याचा दावा आता बड्या पर्यटक कंपन्या करत आहेत. 'गो होमस्टेज'ने तर तुर्कीबरोबरची भागीदारी संपुष्टात आणत असल्याचे जाहीर केले.
इक्सिगो कंपनीने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “आपल्या देशाशी एकनिष्ठता दाखवत असताना आम्ही तुर्की , अझरबैजान आणि चीनच्या सर्व हॉटेल बुकिंग, विमानाची तिकिटे रद्द करत आहोत. जेव्हा गोष्ट भारतावर येते, तेव्हा आम्ही व्यवसायाचा विचार करत नाहीत, जय हिंद.”
इक्सिगोशिवाय 'कॉक्स अँड किंग्स', 'एजमायट्रिप' आणि 'गो होमस्टेज' यांनीही आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत तुर्की आणि अजरबैजान देशाचा निषेध व्यक्त केला आहे. या देशातील पर्यटनाच्या सर्व आरक्षणे रद्द करण्यात आली असून यापुढे या देशांच्या आरक्षणे घेतल्या जाणार नसल्याचे सांगितले.
Related
Articles
जितेश शर्मामुळे बंगळुरुचा खास विक्रम
29 May 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा महत्वाचा कणा
02 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह
30 May 2025
जितेश शर्मामुळे बंगळुरुचा खास विक्रम
29 May 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा महत्वाचा कणा
02 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह
30 May 2025
जितेश शर्मामुळे बंगळुरुचा खास विक्रम
29 May 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा महत्वाचा कणा
02 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह
30 May 2025
जितेश शर्मामुळे बंगळुरुचा खास विक्रम
29 May 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा महत्वाचा कणा
02 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात