मनिला : मध्य फिलीपिन्समध्ये मंगळवारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. याची राख सुमारे ४.५ किलोमीटरपर्यंत उसळली आणि आकाशात धुराचे लोट पसरले. यामुळे मोठा आवाजही ऐकू आला. फिलीपिन्स ज्वालामुखी आणि भूकंप देखरेख संस्थेने भूकंपीय आणि इन्फ्रासाउंड डेटाच्या आधारे म्हटले आहे, की कानलाओनच्या शिखरावर मध्यम स्वरूपाचा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या स्फोटानंतर धुराचे लोट सुमारे साडेचार किलोमीटरपर्यंत वर गेले आणि नंतर ते नैऋत्येकडे सरकले. या ज्वालामुखीची राख नेग्रोस बेटावरील नैऋत्येकडील नऊ गावांमध्ये पसरली; परंतु यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. एप्रिलमध्येही येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.
Fans
Followers