E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
असा लागला पोलिसांच्या हाती
पिंपरी
: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरारी नीलेश चव्हाण याला पकडण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना दहा दिवसांनी यश आले. नेपाळ सीमेवरून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. वैष्णवीच्या मुलाची हेळसांड करणे, चुलत्यांसह इतरांना धमकावणे याप्रकरणी चव्हाणवर गुन्हा दाखल होता. त्यानंतर तो फरारी झाला.
त्याने पुणे, मुंबई, कर्जत, रायगड असा प्रवास केला. २५ मे रोजी खासगी ट्रॅव्हल्सने उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून दिल्लीला गेला. वातानुकूलित असलेल्या या खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्यात नीलेश दिसून आला. स्लीपर सीटवरून उतरत असताना, हाती पाण्याची बाटली घेतलेला नीलेश चव्हाण बिनधास्तपणे फिरताना पाहायला मिळाला. त्यानंतर तो सोनोली (उत्तर प्रदेश), भैरवामार्गे (नेपाळ) काठमांडू येथे पोहोचला. भैरवामार्गे सोनोलीमध्ये आल्यावर नीलेशला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली. पाच दिवस तो नेपाळमध्येच मुक्कामी होता, असे पोलिसांनी सांगितले.
वैष्णवी कस्पटे-हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर अनेक खुलासे होण्यास सुरुवात झाली. वैष्णवीचे बाळ नीलेशकडे दोन दिवस होते. ते घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना त्यांना बंदूक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली होती. त्यानुसार, पोलिसांनी २१ मे रोजी चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो अटक होण्याआधीच फरारी झाला होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली सुरू केल्या. त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी लूक आउट नोटीस जारी केली. त्यानंतर पोलिसांनी चव्हाणची संपत्ती जप्त करण्यासाठी नोटीस जारी केली होती. त्याच्या दुसर्याच दिवशी चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याला नेपाळच्या सीमेवरून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली.
त्याच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथकांची स्थापना केली होती. अँटी गुंडा स्क्वॉड आणि पुणे क्राइम ब्रँच संयुक्तपणे कार्यवाही करीत होती. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला. यामध्ये पुणे, मुंबई, कोकण तसेच कर्नाटक आणि गोवा भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याचे मित्र, नातेवाईक व संपर्कात असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी सुरू केली होती. अखेर त्याला दहा दिवसांनी अटक करण्यात आली.
बाळाचा कायदेशीर ताबा आजीकडे
वैष्णवीच्या मृत्यूपश्चात तिचा नऊ महिन्यांचा मुलगा जनक याचा सांभाळ करण्यासाठी जिल्हा बालकल्याण समितीने त्याच्या आजी व वैष्णवी यांच्या आई स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बालसंरक्षण समितीने जनकचा कायदेशीर ताबा आणि बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी आजी स्वाती कस्पटे यांची असेल, असे म्हटले आहे.
यासंदर्भात पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले, नीलेशवर गुन्हा दाखल केल्यापासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत फिरत होता. सुरुवातीला तो पुण्यातून रायगड येथे गेला. तेथून तो दिल्लीला गेला. दिल्ली, गोरखपूर, मार्गे सोनोली, भैरावाहमार्गे नेपाळचे काठमांडू असा प्रवास करीत गेला. त्यानंतर तो भैरावाह येथून उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील सोनोलीला आला. त्याची माहिती मागावर असलेल्या पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. नीलेशकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची धागेदोरे कुठपर्यंत आहेत, हे स्पष्ट होणार आहे.
Related
Articles
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान
17 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान
17 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान
17 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान
17 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !