E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
सीबीएसई बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर!
Samruddhi Dhayagude
13 May 2025
गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज बारावीनंतर दहावीचा निकालही जाहीर केला. CBSE दहावीच्या निकालात ९३.६०% विद्यार्थी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ०.०६% ने वाढले आहे. मुलींनी मुलांपेक्षा २.३७% पेक्षा जास्त पॉईंट्सने आघाडी घेतली आहे. एकूण ९५% मुलींनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
यंदाच्या परीक्षेसाठी एकूण २६६७५ शाळांमधून एकूण २३ लाख ७२ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी २२ लाख २१ हजार ६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी एकूण ९३.६०% विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यावर्षी ९३.६६% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या वर्षी त्रिवेंद्रम आणि विजयावाडा या विभागाचा सर्वाधिक निकाल लागला. या विभागात सर्वाधिक ९९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
गुणपत्रिका डिजिलॉकर, उमंग अँपवरही मिळणार!
अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना डिजिलॉकर आणि उमंग ऍपवरही त्यांची गुणपत्रिका मिळेल. यासाठी तुम्हाला रोल नंबरच्या मदतीने ऍपवर लॉग इन करावे लागेल. तुम्ही तुमच्या मोबाईलवर मार्कशीट डाउनलोड करू शकाल.
गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही
सीबीएसई बोर्ड गुणवत्ता यादी जाहीर करत नाही. याशिवाय, निकालात कोणताही टॉपर घोषित केलेला नाही. मंडळाने सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांना कोणत्याही मुलाला शाळा किंवा जिल्ह्याचा टॉपर म्हणून घोषित करू नये, असे निर्देश दिले आहेत.
मूळ गुणपत्रिका शाळेत मिळेल...
निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिका ऑनलाइन तपासू शकतात. परंतु हे केवळ तात्पुरते आहे. विद्यार्थ्यांना त्यांची मूळ गुणपत्रिका त्यांच्या शाळेतून घ्यावी लागेल. पुढील अभ्यासासाठी आणि इतर अधिकृत गोष्टींसाठी मूळ गुणपत्रिका आवश्यक आहे. ती विद्यार्थ्यांना शाळेतूनच घ्यावी लागेल.
विभाग निहाय निकाल
त्रिवेंद्रम – ९९.७९%
विजयवाडा – ९९.७९%
बेंगळुरू – ९८.९०%
चेन्नई – ९८.७१%
पुणे – ९६.५४%
अजमेर – ९५.४४%
दिल्ली पश्चिम – ९५.२४%
दिल्ली पूर्व – ९५.०७%
चंदीगड – ९३.७१%
पंचकुला – ९२.७७%
भोपाळ – ९२.७१%
भुवनेश्वर – ९२.६४%
पाटणा – ९१.९०%
डेहराडून – ९१.६०%
प्रयागराज – ९१.०१%
नोएडा – ८९.४१%
गुवाहाटी – ८४.१४%
Related
Articles
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
कसोटी क्रिकेटच्या उत्कर्षात कोहलीचे योगदान
29 May 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
कसोटी क्रिकेटच्या उत्कर्षात कोहलीचे योगदान
29 May 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
कसोटी क्रिकेटच्या उत्कर्षात कोहलीचे योगदान
29 May 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
कसोटी क्रिकेटच्या उत्कर्षात कोहलीचे योगदान
29 May 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार