श्रीलंकेत बस दरीत कोसळून २१ जणांचा मृत्यू   

कोलंबो : श्रीलंकेत एक प्रवासी बस कड्यावरून घसरून १०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक जण जखमी झाले. मध्य प्रांतातील कोटमाले येथे डोंगराळ भागात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.  
 
अपघातग्रस्त बस दक्षिणेकडील तीर्थक्षेत्र कटारागामा येथून वायव्येकडील कुरुनेगाला शहरात ७५ प्रवाशांना घेऊन जात होती. रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि बस  खडकावर आदळून १०० मीटर खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि लष्कर घटनास्थळी पोहोचले. बचाव कार्यात स्थानिक लोकांनीही महत्त्वाचा सहभाग घेतला. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. तिथे २१ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ३० हून अधिकजण जखमी आहेत. त्यामधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात बसचा वेग आणि चालकाचा बेजबाबदारपणा  हे अपघाताचे मुख्य कारण मानले जात आहे. 
 

Related Articles