E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी सक्तीच्या बंधपत्रित सेवेची अट रद्द
Wrutuja pandharpure
29 May 2025
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्णय
मुंबई
, (प्रतिनिधी) : शासकीय तसेच महापालिकेच्या वैद्यकीय महविद्यालयातून एमबीबीएसचा अभ्याक्रम पूर्ण केल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीची शासनाची बंधपत्रित सेवा पूर्ण केल्याशिवाय पदवीधर विद्यार्थ्यांना एमडी, एमएस यासारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नव्हता. ही अट रद्द करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. यामुळे आता पदवीधर विद्यार्थ्यांना थेट पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधेचा, कर्मचार्यांचा अभाव लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणात पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष ग्रामीण भागात जाऊन सेवा करणे बंधनकारक करण्यात आले होते.
शासकीय तसेच महापालिकेच्या वैद्यकीय महविद्यालयातून एमबीबीएसचा अभ्याक्रम पूर्ण केल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीची शासनाची बंधपत्रित सेवा पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना एमडी, एमएस तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरवता येणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसा शासन निर्णय २०१७ मध्ये जारी करण्यात आला होता. ही बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणाची अट शिथील करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणास स्थगिती देण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. बंधपत्रित सेवेच्या अटीस स्थगिती देण्यात आल्यामुळे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणार्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला अल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
बंधपत्रित सेवांची अट २०१९ - २० मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून लागू करण्यात आली होती. तसेच, याबाबत विद्यार्थी संघटनांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे या अटीची अंमलबजावणी प्रत्यक्षात करण्यात येत नव्हती. यंदाची पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षा ही जून महिन्यात होणार आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बंधपत्रित सेवेच्या अटीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, बंधपत्रित सेवेसाठी आवश्यक जागा सार्वजनिक आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. उपलब्ध असलेल्या जागांचा विचार करता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी पदवी अभ्याक्रमानंतरची बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणाला स्थगिती देण्यात आली आहे.
Related
Articles
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
वाचक लिहितात
11 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
वाचक लिहितात
11 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
वाचक लिहितात
11 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
वाचक लिहितात
11 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक