E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दुभाजकावर दुचाकी आदळल्याने तरूणाचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
12 May 2025
पुणे : मित्राच्या लग्न समारंभाचा कार्यक्रम संपवून दुचाकीवरून घरी जाणार्या तरूणाचा दुभाजकावर वाहन धडकल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात घडली. अपघातात दुचाकीवर मागे बसलेला सहप्रवासी तरुण जखमी झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण पुण्यातील ‘स्व-रूपवर्धिनी’ संस्थेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.
समाधान संभाजी भिटे (वय ३१, नीर निंबगाव, ता. इंदापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर, दुचाकीवरील सहप्रवासी पोलीस उपनिरीक्षक मयूर सुनील डोंगरे (वय २९) हे जखमी झाले आहेत. डोंगरे हे सध्या मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
समाधान भिटे आणि त्यांचा भाऊ सध्या मंगळवार पेठेत राहायला होते. समाधान आणि मयूर यांच्या उपजिल्हाधिकारी असलेल्या मित्राचे शनिवारी लग्न होते. लोणी काळभोर भागातील सोरतापवाडीतील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. समाधान आणि मयूर शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हळदीचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून घरी निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट परिसरात भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. अपघातात समाधान आणि सहप्रवासी मयूर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, शनिवारी सकाळी सातच्या सुमारास समाधान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समाधान यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘स्व-रूपवर्धिनी’ संस्थेत शोककळा पसरली.
Related
Articles
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
राज्यात मान्सून स्थिरावला
28 May 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत
31 May 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
राज्यात मान्सून स्थिरावला
28 May 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत
31 May 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
राज्यात मान्सून स्थिरावला
28 May 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत
31 May 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
राज्यात मान्सून स्थिरावला
28 May 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात