हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू   

उत्तरकाशी, (उत्तराखंड) : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगनानीजवळ एका खाजगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सात जण होते. काल सकाळी ८:४५ वाजता ऋषिकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर हे हेलिकॉप्टर कोसळले. 
 
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एसडीआरएफ) मिळालेल्या माहितीनुसार, एरोट्रान्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे हे हेलिकॉप्टर होते. कॅप्टन रॉबिन सिंग हे हेलिकॉप्टर चालवत होते. हेलिकॉप्टरमध्ये चार जण मुंबईचे आणि दोन जण आंध्र प्रदेशाचे होते. हे हेलिकॉप्टर गंगोत्रीच्या दिशेने निघाले होते.

Related Articles