E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
खराडीतील कॉल सेंटरमध्ये काम करणार्या १२३ जणांचा तपास सुरू
Wrutuja pandharpure
29 May 2025
सहा महिन्यांत केलेल्या गुन्ह्यांची माहिती काढणार
पुणे
: अमेरिकेतील नागरिकांना विविध कारणे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत कोट्यवधी रुपये उकळणार्या खराडी येथील बनावट कॉलसेंटरमधील १२३ जणांची पुणे पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. या १२३ जणांनी मागील सहा महिन्यांत देशात अशा प्रकारचे कोठे-कोठे गुन्हे केले आहेत?, याचा शोध आता पोलिस घेत आहेत. गुन्हे शाखेची सहा पथके या गुन्ह्याचा तपास करीत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
गुन्हे शाखेने याप्रकऱणी आत्तापर्यंत ५ जणांना अटक केली असून, मुख्य सूत्रधारासह तिघे फरार आहेत. अटक केलेले आरोपी हे गुजरात, राजस्थान या राज्यांतील आहेत. ’तुमच्या खात्यातून अंमली पदार्थांचे व्यवहार झाले आहेत, तुम्हाला पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते, अशी भीती घालून त्यातून बचावासाठी आभासी चलन किंवा अॅमेझॉन गिफ्ट व्हाउचरच्या स्वरूपात त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते.
गुन्ह्याची व्याप्ती आंतराष्ट्रीय पातळीपर्यंत असल्यामुळे तपासासाठी सहा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक पथकाला कामाची विभागणी करून देण्यात आली आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणार्या कर्मचार्यांची तीस-तीसच्या गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यांची पुर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे.
तसेच, त्यांची माहिती ती अद्ययावत करण्यात येत आहे. पुढे ही माहिती सायबर गुन्हेगारी संदर्भात राष्ट्रीय स्तरावर काम करणार्या यंत्रणांना दिली जाणार आहे. त्यांनी जर इतर राज्यांत असे गुन्हे केले असतील, त्या गुन्ह्यात आरोपींना बाहेरच्या राज्यांतील पोलिसांकडे वर्ग केले जाणार आहे.आरोपी या कॉल सेंटरमधून मागील सहा महिन्यात किती अमेरिकन नागरिकांना कॉल करण्यात आले हे पोलिस पडताळून पाहत आहेत. त्यांना दररोज एक लाख अमेरीकन नागरिकांचा डेटा देण्यात येत होता. याबाबतची माहिती गोळा करून ‘एनसीआरबी’कडे पाठवून देण्यात येणार आहे. याच बरोबर हे आरोपी फसवणूक करण्यासाठी टार्गेट कसे ठरवायचे, त्यांची मोडस ऑपरेंडी कशी होती, याचासुद्धा अभ्यास पोलिस करत आहेत.
आरोपींनी देश-विदेशातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक केलेले पैसे बिटकॉईन आणि हवालाच्या माध्यमातून भारतातआणत होते. त्यासाठी त्यांनी कोणत्या बँक खात्याचा वापर केला आहे, पोलिसांनी ताब्यात घेतलेले कॉल सेंटरमधील कर्मचारी विविध राज्यांतील आहेत. ते मागील सहा महिन्यांत कोठे होते. अशा विविध बाजूंनी पोलिस तपास करीत आहेत.
Related
Articles
संगीताच्या व्याकरणापेक्षा मूळ रचनेवर भर असावा
11 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
संगीताच्या व्याकरणापेक्षा मूळ रचनेवर भर असावा
11 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
संगीताच्या व्याकरणापेक्षा मूळ रचनेवर भर असावा
11 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
संगीताच्या व्याकरणापेक्षा मूळ रचनेवर भर असावा
11 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक